वाळू करणार का तांदलवाडीचा ग्रामपंचायत निवडणुकीत तक्तापलट ?
कोण होणार लोकनियुक्त सरपंच ?
संदीप पाटील (पोलीसराज मिडिया) दि. 19/01/2026
सध्या तांदलवाडी गाव जिल्ह्या भरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात रेती संदर्भात नावाजलेले आहे.तांदलवाडी येथील रेती जळगाव ,धुळे ,नाशिक ,मुंबई अशा अनेक शहरा पर्यत पोहचली आहे .स्वच्छ रेती भाव कमी असल्यामुळे नागरिकांची पहिली पसंती तांदलवाडी येथील रेतीला आहे.तापी नदीवरून वाळू वाहतूक जोराने सुरु आहे. आता राहिला वाळू वाहतूक विरोधाचा प्रश्न, तांदलवाडी ग्राम पंचायतीची निवडणूक जवळ येते आहे .जो तो आपली पोळी शेकताना दिसतो आहे. जुन्यां विरुद्द नवीन अशी फळी उभी राहतांना दिसत आहे.आतापासून हळूहळू प्रचाराचे वारे सुरु झाले आहेत. रेतीला विरोध म्हणजे आपल्याकडे मतदार वळतील अशी आशा तरुण पिढीला लागली आहे.शेवटी दिग्गज हे दिग्गज असतात हे नवीन पिढीला विसरून चालणार नाही. निवडणुकीसाठी वर्चस्व ,प्रभुत्व आणि द्रव्य या गोष्टी असाव्या लागतात या गोष्टी नवीन पिढीला विसरून चालणार नाही.
आज पर्यत गावाचा विकास अधांतरी – नवीन पिढी
मागील अनेक वर्षापासून सत्तेत असलेले, जे ग्रामपंचायत मध्ये निवडून येतात त्यांनी गावाचा विकास अधान्तारीचा ठेवला.आपण नवीन काहीतरी करू आशा अपेक्षेने नवीन पिढी निवडणुकीच्या रिंगणात येतांना दिसत आहे. पण कमान बांधून तीर हत्तात धरणे पाहिजे तेवढे सोपे नाही हे नवीन पिढीने लक्षात ठेवले पाहिजे.
असो ...नवीन पिढीला सुद्धा संधी मिळायला पहिले अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे.परुंतु जुन्या उमेदवारांना डावलून चालणार नाही.
निवडणुकीत 'वाळू' ठरणार का निर्णायक मुद्दा?
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार सध्या विकासाच्या मोठ्या गप्पा मारत आहेत. मात्र, गावातील नैसर्गिक संपत्तीची होणारी लूट थांबवण्यासाठी कोण पुढे येणार, याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे. अनेकदा वाळू माफियांशी असणाऱ्या 'अर्थपूर्ण' संबंधांमुळे लोकप्रतिनिधी या विषयावर मौन बाळगतात, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
"आम्हाला गावाचा विकास आणि पाणी हवे आहे, पण जर वाळूच्या अती ऊपशामुळे कुपनलीकांचे पाणी कमी होणार असतील, तर अशा विकासाचा काय उपयोग? जो उमेदवार वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचे आश्वासन देईल, त्यालाच आम्ही मतदान करू."
— एक जागरूक ग्रामस्थ
भावी सदस्यांची भूमिका काय?
ग्रामपंचायत सदस्यांकडे गावाच्या नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्याचे अधिकार असतात. ग्रामसभेत ठराव घेऊन अवैध वाहतुकीला विरोध करता येतो. मात्र, सत्तेत आल्यावर नवीन सदस्य खरोखरच प्रशासनाकडे पाठपुरावा करतील की वाळू वाहतुकीला साथ देतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ग्रामपंचायत निवडणूक ही गावाच्या सर्वांगीण विकासाची संधी असते. अशा वेळी वाळू वाहतुकीसारखा गंभीर प्रश्न मतदारांनी उमेदवारांच्या समोर मांडणे गरजेचे आहे. आता गावचे 'कारभारी' यावर ठोस भूमिका घेतात की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करतात, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल .
