वाळू ठेका देण्यास स्पष्ट विरोध
प्रतिनिधी चोपडा :- संदिप पाटील
तांदळवाडी (ता. चोपडा) येथील तापी नदीपात्रातील वाळूचा उपसा करण्या संदर्भात आज दि.३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता ग्रामपंचायतीच्या प्रांगणात मा उपसरपंच श्री निश्चल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी वाळू ठेका देण्यासंदर्भात विचार करण्यात आला. सन २०१४ ची भिषण परिस्थिती पाहुण गावातील ग्रामस्थांनी वाळू ठेका देण्यास विरोध केला. यावर ग्रामस्थांचे एकमत होवून तसा ठराव विषेश ग्रामसभेत करून घेतला. तांदलवाडी येथील वाळूचा ठेका रद्द करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
तांदळवाडी पांत्थावरून वाळू वाहतूक चालते याचा थेट परीणाम शेतातल्या कुपनलीकांवर दिसून येतो. उन्हाळ्यात कुपनलीकांचे पाणी आटल्याने शेतीच्या उत्पन्नात घट होते म्हणून ग्रामस्थानी वाळू ठेक्याला स्पष्ट विरोध केला आहे.
तरूण पिढीसमोर वाळू ठेक्याचे संकट*
आजची तरूण पीढी ही शेतीवर अवलंबून आहे. शिक्षण असून रोजगार नाही, धंदा टाकायला भांडवल नाही, पर्याय फक्त शेतीच.. शेतीला पिणी मिळाले नाही तर ..मग शेतीच करणे बंद झाले तर जगायचे कसे ? असा प्रश्न तरूण पिढीसमोर ऊभा राहीला आहे. साहेब नोकरी नका देवू पण वाळू ठेवा देवून आम्हाला मारू नका अशी आर्त हाक तरूण शेतक-यांनी केली आहे.

सन २०१४ मध्ये दिलेल्या वाळू ठेक्याच्या वेळी टोपली पावडीने वाळू भरावी असा नियम होता,परंतू नियमाला धाब्यावर बसवून चक्क पोकलॅड ने वाळू ऊपसा होत होता.याचा गंभीर परीणाम शेतातील कुपनलीकांवर झाला होता.यावेळी वाळू ठेका देवू नये असा ठराव करण्यात आला आहे.सदरील ठरावाची प्रत मा तहसीलदार चोपडा ,मा.प्राताधिकारी अमळनेर, मा पालकमंत्री जळगाव,मा महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना रवाना करण्यात येणार आहे.