चोपड्याचा कलाशिक्षक चमकणार राज्यस्तरावर
चोपडा (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संचलित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा
शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट जालना आयोजित राज्यस्तरीय शालेय विविध क्लब सादरीकरण स्पर्धेत नंदुरबार येथे संपन्न झालेल्या विभाग स्तर स्पर्धेत 32 स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक राकेश राजकुमार विसपुते कलाशिक्षक विवेकानंद विद्यालय, निमगव्हाण केंद्र, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव ,विभाग नाशिक यांनी पटकावला. विवेकानंद विद्यालयात सुरू असलेल्या विविध क्लब पैकी एक क्लब मशीन व रोबोटिक्स क्लबचे जून पासून तर आतापर्यंतचे केलेल्या कार्याचे सादरीकरण विभाग स्तरावर अतिशय सुंदर पद्धतीने मांडले व प्रथम क्रमांक पटकावित राज्यस्तरावर झेप घेतली आहे. नऊ जानेवारीला जालना येथे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहेत त्यात ते नाशिक विभाग, जळगाव जिल्हा, चोपडा तालुका, निमगाव केंद्र ,विवेकानंद विद्यालयाचे प्रतिनिधित्व करतील. या यशासाठी जळगाव डाएट विभागातील सर्व अधिकारी, अधिव्याख्याते, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी ,पालक वर्ग व विद्यार्थी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.
