प्रख्यात डबल मर्डर-"चोपडा" ऑनर किलिंग प्रकरणातील मरणोप्रांत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व कैद्यांना मे. औरंगाबाद हायकोर्टातुन शिक्षा निलंबन व जामीन मंजूर

Advertisement

प्रख्यात डबल मर्डर-"चोपडा" ऑनर किलिंग प्रकरणातील मरणोप्रांत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व कैद्यांना मे. औरंगाबाद हायकोर्टातुन शिक्षा निलंबन व जामीन मंजूर

 प्रख्यात डबल मर्डर-"चोपडा" ऑनर किलिंग प्रकरणातील मरणोप्रांत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व  कैद्यांना मे. औरंगाबाद हायकोर्टातुन शिक्षा निलंबन व जामीन मंजूर


पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील 



सन 2022 साली चोपडा शहरात आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून दोन तरूण प्रेमी युगलांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. सदरील गुन्ह्यात मे. अमळनेर सत्र न्यायालयात खटला चालून एकूण सात आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यापैकी पाच आरोपींना मरणोप्रांत जन्मठेपेची शिक्षा तसेच उर्वरीत दोन आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दिनांक 01/04/2024 रोजी सदर फौजदारी खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला व सर्व आरोपींना न्यायालयातूनच अटक करण्यात आली. 

सदर निकालाने व्यथित सर्व कैद्यांनी मे. हायकोर्ट औरंगाबाद येथे फौजदारी अपील दाखल केले होते. सदर फौजदारी अपीलात वेळोवेळी सुनावण्या होवून सर्वच कैद्यांचे शिक्षा निलंबन करण्यात आले व त्यांची तुरुंगातून जामीनावर सुटका करण्यात आली. हायकोर्टात कैद्यांच्या वतीने ॲङ जितेंद्र पाटील यांनी युक्तीवाद केला.

आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून 2022 रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी चोपडा शहरातील तरुणाची गोळी मारुन तर तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूर चोपडा) अशी मयत युगलाची नाव आहेत. या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सदर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तत्कालीन विधानसभेत देखील गाजला होता. तरुणीच्या अल्पवयीन भावांनी दोघांची हत्या केली होती. वर्षा व राकेश ह्यांच्या प्रेमसंबंधामुळे परिवाराची सामाजिक बदनामी होते त्याचा राग मनात धरत आरोपीनी सदर खून केले होते.  

एकूणच सर्व आरोपींच्या विरुध्द खुन करणे, खुनाच्या कटात सहभागी असणे, पुरावे नष्ट करणे  असे आरोप लक्षात घेवून सत्र न्यायालयात खटला चालविण्यात आला. दिनांक 01/04/2024 रोजी सदर खटल्याचा निकाल होवून एकूण सात आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यापैकी पाच आरोपींना मरणोप्रांत जन्मठेपेची शिक्षा तसेच उर्वरीत दोन आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सर्व कैद्यांनी मे. हायकोर्ट औरंगाबाद येथे फौजदारी अपील दाखल केले होते. सदर फौजदारी अपीलात वेळोवेळी सुनावण्या होवून मा. उच्च न्यायालयातील मा. आर.जी. अवचट व मा. एन.पी. धोटे यांच्या पिठाने सर्वच कैद्यांचे शिक्षा निलंबन करत सर्व कैद्यांची तुरुंगातून जामीनावर सुटका केली. नुकताच दिनांक 18/02/2025 च्या निकालान्वये मुख्य आरोपी तुषार आनंदा कोळी याचा शिक्षा निलंबन व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. मा. हायकोर्टात कैद्यांच्या वतीने ॲङ जितेंद्र पाटील यांनी बाजू मांडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या