बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!
छत्रपती शिवराय आणि विठ्ठल-रखुमाईंची प्रतिमा भेट देऊन वाढदिवस साजरा
जळगाव | (प्रतिनिधी) संदिप पाटील
बोरखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री. विजय माणिक पाटील व श्री. रतिभान भागवत पाटील (सतखेडेकर) तसेच भुसावळ येथील श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील यांचा नातू व सौ. दिव्या आणि श्री. सागर रतिभान पाटील यांच्या चिरंजीवाचा प्रथम वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने एका विशेष आणि प्रेरणादायी भेटीची परिसरात चर्चा रंगली आहे.
नालंदा भेटीतून दिला प्रेरणेचा संदेश
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री. नवलसिंग राजे पाटील यांनी या चिमुकल्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना एक आगळीवेगळी भेट पाठविली. लहान वयापासूनच मुलांवर आदर्श संस्कार व्हावेत, या उद्देशाने त्यांनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भक्तीचे प्रतीक विठ्ठल-रुक्मिणी यांची प्रतिमा शुभेच्छा रुपी भेट म्हणून पाठवली.
मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द
ही प्रेरणादायी भेट श्री. नवलसिंग राजे पाटील यांच्या वतीने श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते कुटुंबियांना प्रदान करण्यात आली. केवळ औपचारिक सोहळा न करता, महापुरुषांचे विचार आणि भक्तीची परंपरा जपण्याचा हा प्रयत्न उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
यावेळी पाटील परिवारातील सदस्य, ग्रामस्थ आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चिमुकल्याला उदंड आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या या अनोख्या उपक्रमाचे बोरखेडा परिसरातून कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या