चोपडा प्रतिनीधी-संदिप पाटील
पोलीसराज मिडिया
दिनांक २८/१२/२०२५ रोजीचे सकाळी रात्रपाळी अधिकारी पोहवा वासुदेव ठोसरे/६४७ हे पो. ठाणे अकोट ग्रामीण हददीतील दर्यापुर रोडवरील अकोट भाग २ बी मध्ये गस्त घालत असतांना दोन अज्ञात इसम त्याचे दुचाकीवर कापसाचे गाठोडे घेवुन जात होते. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते थांबले नसल्यामुळे संशयास्पद हालचालीवरूण पो.हवा. ठासेरे यांनी त्यांना विचारपुस केली असता
त्यांचे नाव १) दिपक सुरेश गवते वय २० वर्ष तसेच २) राजेश पन्नालाल कासदेकर वय २३ वर्ष दोन्ही रा.चिपी गायराण ता. तेल्हारा जि. अकोला असे सागिंतले. त्यावरूण दोन्ही राहणार हे तेल्हारा तालुकयाचे असुन अकोट अमरावती रोडावर एवढ्या अंधाऱ्या रात्री काय करित आहे व तुमच्याजवळ असलेले कापसाचे गाठोडे कोठे घेवुन जात आहेत तसेच इतर माहीती विचारली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पक्की खात्री झाली की, सदर दोन्ही इसमांनी कोणत्यातरी शेतकऱ्याचे शेतातुन कापुस चोरून आणला आहे म्हणुन नमुद इसमांना चौकशीकामी पोलीस स्टाफचे मदतीने पोलीस ठाणे अकोट ग्रामीण येथे आणण्यात आले.
त्यादरम्याण अब्दुल सलीम अब्दुल रफिक वय २८ वर्ष धंदा शेती रा. सोमवार वेस खतीब पुरा अकोट हे सकाळी पोलीस ठाणेस आले व त्यांनी सागितले की, त्यांचे शेतातील अज्ञात इसमांनी कापुस वेचुन चोरून नेला आहे. यावरूण पोलीस ठाणेला एक मोटारसायकल क. एमएच ३० टी ४५०० ज्यावर दोन इसमांनी वेचलेला कासचे गडडे त्यांना दिसल्याने त्यांची खात्री झाली की, याच चोरटयांनी त्यांचे शेतातील कापुस चोरून नेला आहे. वरूण यातील शेतकरी तसेच दोन संशयीत इसम आणि पोलीस स्टाफ असे सर्व मिळुन त्यांचे शेतात गेले असता शेतातील कापुस चोरी गेल्याचे दिसुन आले व सदर घटनास्थळी यातील संशयीतांनी हयाच शेतातुन अंदाजे ०१ क्विंटल कापुस किं.अं. ८०००/रू. किंमतीचा आम्हीच चोरी केल्याबाबत कबुली दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या रिपोर्टवरूण गुन्हा दाखल केला असुन तपासावर आहे. आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली दुचाकी क्र. एमएच ३० टी ४५०० किं.अं.५०,०००/रू. असा एकुण ५८०००रू किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक, अर्चित चांडक साहेब यांचे आदेशान्वये मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. चंद्रकांत बी. रेडडी यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक श्री. निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार किशोर जुनघरे, पोउपनि मिनाक्षी काटोले, पो. हे. कॉ वासुदेव ठोसरे, पो.हे. कॉ. निलेश खंडारे, पो.हे.कॉ. विठठल चव्हाण, पो.हे. कॉ. आठवलें, पोशी गोपाल जाधव, पोशी पांडव यांनी केली.