पोलीसराज मिडिया - चोपडा
संदिप पाटील
भुसावळ, दि. 26 जून 2024 –
वीर गुजर सेना या सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विविध पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
संघटनेच्या वतीने संबंधित कार्यकर्त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष हेमत पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी. पाटील , तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरण पाटील यांच्या उपस्थितीत प्रमोद जगन्नाथ पाटिल यांच्या वर भुसावळ तालुका अध्यक्ष ची जबाबदारी देण्यात आली व अधिकृत नियुक्ति पत्र देऊन तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति केली व हा नियुक्ती सोहळा पार पडला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आजवर केलेले समाजकार्य कौतुकास्पद असून यापुढेही ते संघटनेचे कार्यकर्ते म्हणून समाज संघटन, युवक मार्गदर्शन व सामाजिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ 26 जून 2030 पर्यंत राहणार आहे.पुढील कार्यासाठी हेमंत पाटील (संस्थापक अध्यक्ष) ,मंगल बी. पाटील (सर) (राष्ट्रीय सचिव), सौ. विद्या पाटील (राष्ट्रीय सहसचिव), राजेंद्र पाटील (राष्ट्रीय उपाध्यक्ष) ,वसंत पाटील (राष्ट्रीय उपाध्यक्ष) ,किरण पाटील (प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
