मैत्रीला तरुणीने दिला नकार आणि तिच्या गळ्यावर झाले 5 वार
अमरावती - अभियांत्रिकी शिकणाऱ्या 19 वर्षीय तरुणीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली, विशेष म्हणजे मृतक तरुणी ही सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची मुलगी आहे.
अमरावती-बडनेरा हायवेलगत वडुरा जंगलात 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह व त्याच ठिकाणी एक तरुण गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला.
ब्रेकअप करण्याच्या वादातून तरुणीची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी लावला आहे.
परतवाडा येथे राहणारी 19 वर्षीय संजना शरद वानखेडे असे मृत तरुणीचे नाव असून जखमीचे परतवाडा येथील 19 वर्षीय सोहम गणेश ढाले असे नाव आहे.
मृतक व जखमी हे दोघे बडनेरा येथील न्यू राम मेघे इंजिनिअरिंग कॉलेज मधील पहिल्या वर्षाचे विद्यार्थी आहे, सोहम व संजना दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्याने दोघांची मैत्री होती, मात्र संजना ला सोहम ची मैत्री आवडत नसल्याने तिने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे संजना ची हत्या करण्यात आली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे.
मृतक संजना च्या गळ्यावर अत्यंत निर्दयीपणे कटर ने तब्बल 5 वेळ वार करण्यात आला होता, ज्यामुळे अति रक्तस्राव झाल्याने संजना चा मृत्यू झाला, सोहम च्या हातावर सुद्धा कटरचे वार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही, सदर प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन मगर, पोलीस उपनिरीक्षक उमेश मारोडकर करीत आहे.

