गाडी आणि घातक हत्यारांसह दोन आरोपींवर गुन्हा दाखल.
दहिवडी ता.मान :- दिनांक 15 मे रोजी मौजे दहीवडी येथील अजीत मेडिकल समोर दोन इसम घातक हत्यार घेवून ऊभे अशी गुप्त बातमी श्री. अक्षय सोनवणे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना मिळाली.अक्षय होनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 23/50 वा. चे. सुमारास मौजे दहिवडी येथे अजित मेडिकल समोर दोन इसम त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलचे डिक्कीत घातक हत्यार ठेवून गाडी जवळ उभे होते,पोलीसांनी त्यास हत्यारा संबंधी विचारले असता पोलीसांनी खाकी दाखवताच डिक्कीतून सतुर सारखे दिसणारे घातक हत्यार काढून दिले .पवन नेताजी घाडगे वय 20 वर्ष राहणार बिदाल चौक दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा व दुसरा सुमित नवनाथ ठोंबरे वय 21 वर्ष राहणार बिदाल रोड श्रीरामनगर दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा याने वरील वर्णनाचे व किमतीचे सतुर सारखे दिसणारे घातक हत्यार त्याचे ताब्याततील होंडा कंपनीची एक्टिवा स्कुटी क्रमांक एम एच 11 डीजे 3950 च्या डिक्की मध्ये मिळून आले, यांच्यावर गुरनं व कलम 389/2023शस्त्र अधिनियम कलम 4,25अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. अधिक तपास तपासी अधिकारी पोलीस नाईक 243 बनसोडे करत आहेत.कारवाई पथक अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल म्हामणे पोलीस नाईक तुषार हंगे पोलीस कॉन्स्टेबल
रवींद्र बनसोडे पोलीस नाईक यांच्या वेळोवेळी होणाऱ्या कारवाया यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.यांचे पोलीस अधिक्षक श्री समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक श्री बापू बांगर यांनी अभिनंदन केले

