तांदळवाडी हायस्कूलच्या 12 मुलींना मानव विकास कार्यक्रमांतर्गंत मोफत सायकलीचे वाटप • • •
वेळेच्या बचतीसह मुलींची 3 किमीची पायपीट थांबणार...शिक्षणाची आवड निर्माण करणारा मानव विकास चा उपक्रम...
(Tandalwadi) Jay Shree Dadaji High-school उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना खेड्यावरुन लांबून पायपीट करीत शाळेत येतांना, त्यांच्या वेळेची बचत व्हावी, पायपीट थांबावी या उद्देशाने मानव विकास कार्यक्रमांतर्गंत जय श्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडी शाळेतील दोंदवाडे येथून साधारण 3 किमीच्या अंतरावरून येणाऱ्या इ. 8 वी ते 10 वी च्या 12 मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले .
'या मोफत सायकली प्राप्त मुलींनी आता सायकलींच्या वापरातून व्यायामासह आरोग्य जोपासना , वेळेची बचत, थांबणारी पायपीट यातून उपलब्ध शिक्षण संधीचा पुरेपूर उपयोग करीत आपला विकास साधावा ' असे आवाहन सायकल वितरण प्रसंगी उपस्थित शाळेचे संस्थाध्यक्ष डॉ .चंद्रकांत गोकूळ पाटील यांनी केले .
या प्रसंगी यांच्या शुभहस्ते मोफत सायकलीचे वाटप
दोंदवाडे येथील सरपंच गं.भा . प्रभावती हंसराज साळुंखे, तांदळवाडी सरपंच सौ सिंधूबाई निंबा भिल, निमगव्हाण उपसरपंच देवानंद लक्ष्मण पाटील, तांदळवाडी उपसरपंच प्रवीण शंकर धनगर,चोपडा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सतीश गोकूळ पाटील, संस्था सहसचिव ॲड. हृषिकेश मच्छिंद्रनाथ पाटील, डॉ विनोद जगन्नाथ पवार, योगराज गोकूळ पाटील, संस्थेचे माजी सहसचिव धनराज पोपट पाटील, आधार दाजी पाटील या वेळी मुख्याध्यापक विलास पाटील यांनी शासनाच्या विद्यार्थी - विद्यार्थीनी हिताच्या विविध योजनांची माहिती दिली .
मोफत सुंदर, दणकट , आकर्षक सायकली प्राप्त झालेल्या विद्यार्थीनींनी त्यांचा आनंद व्यक्त करीत आम्ही संधीचं सोनं करू अशी प्रतिक्रिया देतांना इ .5 वी ते 7 वी च्या मुलींनाही हा लाभ मिळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक अरुण चव्हाण, व्ही .पी . चोधरी , शिक्षक - कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेत तर सूत्रसंचालन किसन नरहर पाटील यांनी केले .
साधारण 3 किमी पेक्षा जास्त व बऱ्याचदा शाळा भरतांना - सुटतांना फारशी वर्दळ नसलेल्या अंतरावरून रोज पायी येतात मुली

