तांदलवाड़ी येथे हाथ से हाथ जोड़ो अभियान
...काँग्रेसच्या काळातील अनेक योजना बंदतांदलवाड़ी (चोपडा ):-भाजप सरकारच्या काळातील कथित भ्रष्टाचार हा मुद्दा काँग्रेसने आधीपासूनच उचलला आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे महागाई बोकाळली असून बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचा आरोप सोनियाजी गांधी,राहुल गांधी,मलिकार्जुन खरगे,प्रियंका गांधी, नाना पटोले यांच्यासह तमाम नेत्यांनी वारंवार केला. हा मुद्दा मतदारांच्या पचनी पडल्याने कर्नाटक मध्ये काँग्रेस ला यश मिळाले असल्याचे मत नाशिक ग्रामीणचे अभियान प्रभारी तथा समन्वयक व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड संदीप पाटील यांनी व्यक्त केले.
आज दि 16 रोजी तालुक्यातील तांडलवाड़ी येथे "हाथ से हाथ जोड़ो अभियान" प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील,कांग्रेस शहर अध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, चोसाका संचालक गोपाल धनगर,तापी सुतगीर संचालक राजेंद्र पाटील, आधार यादव पाटील, गयभू पाटील आदी होते
यावेळी ॲड संदीप पाटील पुढे म्हणाले की,बहुतांश काँग्रेसशासित राज्यांनी आपल्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.परंतु अजूनही काही राज्यांनी ही योजना लागू केलेली नाही.
यावेळी दिपक पाटील, देवेंद्र पाटील, डी पी चव्हाण, सुभाष पाटील, प्रताप धनगर,यांच्यासह कार्यकरतें उपस्थित होते.


