कापूस व्यापा-यांना शेतक-याकडून आवाहन - मुहर्तला चार पाच किलोचा भाव अव्वाच्या सव्वा आकारू नये
पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
ब-याच शेतक-यांनी मागील वर्षाचा कापूस भाव वाढीच्या अपेक्षेने दाबून ठेवलेला आहे .ऊद्या गणपतीच्या मुहर्ताला कापसाचा भाव निघणार असून व्यापा-यांनी किलोचा भाव अव्वाच्या सव्वा आकारू नये असे आवाहन शेतक-यांकडून सोशलमिडियावर करण्यात येत आहे.
व्यापारी मुहर्ताचा कापूस खरेदी करतांना काही किलोला वाढीव भाव देवून कापूस खरेदी करतात आणी इतर कापूस जुण्याच भावाने खरेदी होतो ,यात फसतो फक्त शेतकरी..म्हणून व्यापा-यांनी कापसाचा मुहर्तचा भाव अव्वाच्या सव्वा भाव काढू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
या आभासी भाववाढीचा थेट परीणाम शेत मजुरीवर होत असतो. कापूस भाववाढ पाहुन मजूर मजूरी वाढीची अपेक्षा व्यक्त करतात पण याचा मोठा फटका शेतक-यांना बसतो.

