केळी पिक विमा काढण्याचा कालावधी वाढवून मिळणेसाठी शेतकरी कृती समीतीचे कृषी मंत्री यांना निवेदन
चोपडा प्रतिनिधी :- संदिप पाटील
चोपडा दि.३१ ऑक्टोबर जळगांव जिल्ह्यामध्ये केळी बाग ही आंबिया बहरात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर लागवड होत असते. सदर लागवडीत रोप व कंद असे दोन प्रकारे लागवड होत असतात. जे शेतकरी कंद लावणी करतात त्यांना उगवण्यासाठी कालावधी जास्त लागतो. परंतू सदर पिकांसाठी पिकविमा काढण्याची मुदत ही ३१ ऑक्टोबर असून त्या दिवसाअखेर शेतात जाऊन जियो टॅगद्वारे फोटो काढावा लागतो परंतू लावणी करुन देखील पिक उगवण्याचा कालावधी जास्त असल्यामुळे शेतात पिक दिसून येत नाही. त्यामुळे सदर शेतकरी हे केळी पिक विम्यापासून वंचित राहत असून सदर केळी पिकासाठी डाळिंब व द्राक्ष सारखे दोन्ही बहरामध्ये विमा काढण्यासाठी समावेश करणेबाबत व पिकविम्याची मुदत ही ३१ डिसेंबर अखेर करणेबाबत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहेत.
<div id="SC_TBlock_882370"></div>
तरी केळी पिकांसाठी पिक विम्याची मुदत ही ३१ डिसेंबर अखेर करणेबाबत तसेच केळी पिकांचा पिक विम्यासाठी वर्षातील दोन्ही बहरात समावेश केल्यास जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना याचा फायदा व्हावा यासाठी शेतकरी कृती समीतीचे निवेदन कृषी मंत्री मा.अनिल पाटील यांना पाठविण्यात आले आहे अशी माहीती एस.बी.नाना पाटील यांनी दिली यावर मंत्री लवचरच शेतकरी हिताचे निर्णय घेतील अशी आशा त्यांना आहे.