शस्त्र घेऊन फिरतांना हद्दपार गुन्हेगारांना अटक
एमआयडीसी पोलिसांची कामगिरी- जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते तरी ते गुन्हेगार आपल्या कब्जात विनापरवाना शस्त्र बाळगून फिरत होतें.
त्या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तुकारामवाडी परिसरात निशांत प्रताप चौधरी (वय २०, रा. शंकरराव नगर) याच्या कब्जात सुरा आढळून आला.त्याला दोन वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
आणि पांडे चौक नजीक रामदेव बाबा मंदीराजवळ स्वप्निल उर्फ गोलु धर्मराज ठाकुर (वय २०, रा. शंकरराव नगर जळगाव) याच्या कब्जात देखील सुरा आढळून आला. दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप. निरी. दिपक जगदाळे, स. फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किशोर पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, नितीन ठाकुर, ललीत नारखेडे, राहुल रगडे, विशाल कोळी, छगन तायडे, किरण पाटील अशांनी केली आहे.

