मध्य प्रदेशच्या गुन्हेगारा कडून रावेरात पिस्टल जप्त;पोलिस प्रशासनाची कामगिरी
जळगाव ( पोलीसराज मिडिया )
सद्या मध्य प्रदेशचे गुन्हेगार रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत आहे.असाच एक आरोपी पिस्टल व जिवंत काडतुस घेऊन रावेर शहरात महामार्गा नजिक फिरत असतांना प्रभारी पोलिस अधिकारी आशीष अडसुळ यांच्या सर्तकतेमुळे जेलबंद झाला आहे.
या बाबत वृत्त असे की प्रभारी पोलिस अधिकारी अडसुळ यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन २२ रोजी रात्रीच्या सुमारास रावेर शहरात बुरहानपुर-अंकलेश्वर महामार्गावर कल्याणी हॉटेल नजिक एक मध्य प्रदेश येथील गुन्हेगार मुजाहिद उर्फ माया ईब्राहम खान वय 27 रा गुलाबगंज लालबाग बुऱ्हाणपुर मध्यप्रदेश हा फिरत असल्याची माहिती मिळाली पोलिस प्रशासनाने क्षणाचाही विलंब न करता मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले यांनी आपल्या टीमसह संबधीत आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता.त्याच्या कडून 15 हजार रूपये किमतीचा एक गावठी कट्टा काळसर रंगाचा,त्याचे मुठचे दोन्ही बाजुस प्लाँस्टीकच्या लाल रंगाचा पट्टया असलेला व ठिकठिकाणी रेषा कोरलेल्या त्यास मॅगझिन असलेला कि.अं.
1200 रूपये किंमतीचे दोन पितळी राऊंड त्यांचेमागील बाजुस 7.65 व इंग्रजीत K.F असे मार्क कोरलेले आढळले संबधीत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ एम राजकुमार,अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशिष आडसुळ , पोउनि सचिन नवले,पोलिस कर्मचारी ईश्वर चव्हाण,सचिन घुगे,विशाल पाटील, प्रमोद पाटील,महेश मोगरे अशांनी केली असुन पुढील तपास पोउनि सचिन नवले करीता आहे.

