आई हेच पहिले विद्यापीठ मग ती शिक्षित असो की अशिक्षित...कवी संदीप जगताप.
ऑक्टोबर ०६, २०२४
0
आई हेच पहिले विद्यापीठ मग ती शिक्षित असो की अशिक्षित...कवी संदीप जगताप.
चोपडा प्रतिनीधी-संदिप पाटील
... पंकजनगर चोपडा येथील नव एकात्मता दुर्गा मंडळ ने दुर्गोत्सव हा फक्त उत्सव म्हणून नव्हे तर आजच्या तरुण तरुणींना वैचारिक देण्याचा निर्णय घेतला व त्या साठी आज कवी संदीप जगताप (पिंपळगाव बसवंत)यांचे "कविता आणि बरेच काही..."या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
कवी संदीप जगताप यांनी आजच्या सामाजिक व सांस्कृतिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना आज समाज दुःखी असण्याचे कारण हे दुसऱ्याचा आनंद पाहता न येणे हा आहे यासाठी त्यांनी "तुमच्या शेतातील ६०क्विंटल द्राक्ष ला चांगला भाव मिळाला तर आनंद होईल की दुःख होईल,उत्तर आले आनंद आणि शेजारच्याच १००क्विंटल लां तोच भाव मिळाला तर काय होईल उत्तर आले दुःख,या उलट तुमचे ६०क्विंटल द्राक्षाचे नुकसान झाले तर काय होईल ते दुःख आणि शेजारच्याच १००क्विंटल द्राक्ष चे नुकसान झालं तर उत्तर आल आनंद होईल...हे सामाजिक चित्र बदलले पाहिजे.या सोबत अडाणी आई ने दिलेल्या काही साध्या साध्या गोष्टी जीवनावर कसा प्रभाव टाकतात हे सोदाहरण सांगितले म्हणून आई हेच आपले पहिले विद्यापीठ आहे तिचा आदर करा असा संदेश दिला.
आजच्या राजकीय स्थितीबद्दल व शेतकऱ्यांचे विदारक परिस्थिती चे वेगवेगळ्या कविता मधून सादरीकरण करून श्रोत्यांना दीड तास खिळवून ठेवले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ कवी अशोक सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून पंकज बोरोले होते.प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय एस बी पाटील यांनी केला तर सूत्रसंचालन प्रा. नंदिनी लाडविकर यांनी तर आभार विपीन बोरोले यांनी मानले.
कार्यक्रमाला विलास पाटील,प्राचार्य आर बी वाघजाले,अमृत वाघ,रमेश सोनवणे,रणजित निकम,संजीव बाविस्कर,कुलदीपसिंग पाटील,अजित पाटील,रणजित निकम,मोहन पाटील,विकास शिर्के,लेखक पारे, भरत पाटील,डॉ रवींद्र पाटील यांचेसह शेकडो श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी साठी ॲड कुलदीप पाटील,अनिल बाविस्कर,धीरज महाजन, ऋषिराज बाविस्कर ,गजानन लाडविकर,निलेश चव्हाण,अभिजित देवरे,किशोर महाजन, सुमित पाटील,यांचेसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Tags


