Type Here to Get Search Results !

पंकज विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव बालकांसाठी पर्वणीच.... माध्य.शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण...

मुख्य संपादक:- संदीप पाटील 0

 पंकज विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव बालकांसाठी पर्वणीच.... माध्य.शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण...


  चोपडा प्रतिनिधी:- संदिप पाटील
अभ्यासक्रमाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासात आम्ही कोठेच मागे नाही, हे प्रत्येक वेळी पंकज विद्यालयाने सिद्ध केले आहे. पंकज विद्यालय सतत स्वत:चा परफॉर्मन्स चढता ठेवत असल्याने सदर सांस्कृतिक महोत्सवास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यातूनच 'भव्य-दिव्य'  कार्यक्रमाची निर्मिती होत आहे असे जळगाव जिल्हा परिषद माध्य. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या.


    शालेय स्तरावरील अभ्यासविषयक स्पर्धा आता सांस्कृतिक कार्यक्रमातही दिसून येत आहे. छोटेखानी होणारे स्नेहसंमेलनाचे स्वरूप आता व्यापक स्वरूपात होत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शाळांना ते आवश्यक ठरते आहे.
    डिसेंबर-जानेवारी महिना आला की ,शाळांसह विद्यार्थ्यांना वेध लागतात ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एक व्यासपीठ शाळा मुलांना उपलब्ध करून देत असते. अभ्यासाबरोबर मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा यासाठीचा हा सर्व खटाटोप असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून छोटेखानी असलेले स्नेहसंमेलनाचे स्वरूप आता विस्तारत आहे. आणि त्यात चोपडा येथील पंकज विद्यालय अव्वल स्थानी असल्याचे त्या म्हणाल्या.


   ७९ गाणी , ८ वेगवेगळ्या विषयांवर थीम व नाटिका सादर करण्यात आल्या. विक्की भाग्या नि पावरी , अंबाबाईचा गोंधळ , संत गोरा कुंभार, पढोगे लिखोगे बनोगे नवाब, आदिवासी नृत्य, हृदयी वसंत फुलताना इत्यादी गीतांनी भरभरून प्रेक्षकांची दाद मिळवली . दुसऱ्या दिवशी इयत्ता ५ वी ते ७ वीच्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांच्या सहभागाने निर्मित "सशक्त भारत"  थीमने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. एज्युकेशन थिम, लगीन थिम, हिरकणी थीम, कलियुग इत्यादी थीमने प्रेक्षकांनी मने जिंकली.शेवटच्या दिवशी उतावीळ नवरा या धम्माल नाटिकेने प्रेक्षकांना लोटपोट हसवले.सलग ३ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देत चिमुकल्या कलाकारांवर कौतुकांचा वर्षाव केला.


  शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक ,शेती ,पर्यावरण  व जलसंधारण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९२ व्यक्तींना संस्थेतर्फे गौरविण्यात आले.
त्यात सुभाष बाळकृष्ण पाटील व सौ. कल्पना सुभाष पाटील ( पुणे ) उत्कृष्ट मातृ सेवा केल्याबद्दल सत्कार, मनोज आत्माराम पाटील - ग. स. पतपेढी जळगाव तज्ञ संचालकपदी निवड तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळावर उल्लेखनीय व कौतुकास्पद निवड बद्दल सत्कार, अजबसिंग सोनूसिंग पाटील - ग. स. पतपेढी जळगाव अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार, ए टी पवार - ग. स. पतपेढी जळगाव उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार, आशिष पुंडलिक पवार - खा. प्रा. शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार, स्वाती धनंजय फिरके - खा. प्रा. शिक्षक पतपेढीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार, अजय सोमवंशी - ग. स. पतपेढी जळगाव कर्ज नियंत्रण समितीवर निवड, विजय दगा पाटील - ग. स. पतपेढी जळगाव तज्ञ संचालकपदी निवड, एकनाथ गुलाबराव पाटील - ग.स. पतपेढी जळगाव तज्ञ संचालकपदी निवड, प्रा.हेमंत अंकुश पाटील - बालकवी ठोंबरे विद्यालय धरणगाव येथे संचालकपदी निवड, तसेच पंकज सुरेश बोरोले - रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या असिस्टंट गव्हर्नरपदी २०२५ - २६ या वर्षांसाठी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. या शिवाय जिल्हयातील ९२ मान्यवरांचा सत्कार संस्थेतर्फे कऱण्यात आला.


      सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटक म्हणून कल्पना चव्हाण ( माध्य. शिक्षणाधिकारी जि.प.जळगाव ) ,जितेंद्र वलटे ( ए पी आय शहर पोलिस स्टेशन ) , अविनाश पाटील ( माजी गटशिक्षणाधिकारी प स चोपडा ) , मनोज पाटील ( अध्यक्ष - स्वामी समर्थ शैक्षणिक मंडळ ) हे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले ,उपाध्यक्ष अविनाश राणे ,संचालक पंकज बोरोले ,सचिव अशोक कोल्हे ,गोकुळ भोळे, नारायण बोरोले, हेमलता बोरोले, दिपाली बोरोले यांसह विभागप्रमुख प्रो.आर आर अत्तरदे, एम व्ही पाटील , व्ही आर पाटील,  मिलिंद पाटील , केतन माळी, मीना माळी आदी उपस्थित होते.
       संस्थेचा अहवाल वाचन संचालक पंकज बोरोले यांनी केला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम व्ही पाटील यांनी केले आभार व्ही आर पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश चौधरी व प्रशांत पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

News Blogger Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable