४४ कोटींचा अफरातफर करणारा अट्टल गुन्हेगार प्रणीत देवानंद मोरेला पकडण्यात ३६ दिवसानंतर पोलीसांना यश
पोलीसराज मिडिया :- दिग्रस
४४ कोटींचा अफरातफर करणारा अट्टल गुन्हेगार प्रणीत देवानंद मोरेला पकडण्यात ३६ दिवसानंतर पोलीसांना मंगळवार, १४ जानेवारीला यश आले.
प्रणीत, प्रीतम, जयश्री व देवांनद मोरे या चौघांना पुणे जिल्हा , मावळ तालुक्यातील लोणावळा येथे पोलीसांनी ताब्यात घेऊन दिग्रस पोलीस ठाण्यात जमा केले.हि वार्ता शहरात पसरताच चांगलीच खळबळ उडाली तर बघ्यांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती.
पांढरकवडा उपविभागीय पोलीस पथक, सायबर सेल पथक व यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकांनी मिळून हि कारवाई केली.साफळा रचून प्रणीत मोरे व इतर तिघांवर झडप घालून ताब्यात घेतले असून देवांनद मोरे यास उपचारासाठी यवतमाळ हलविण्यात आले असून प्रणीत, प्रीतम व आई जयश्री यांना न्यायालयात हजर करण्यात आले असुन न्यायालय काय निर्वाळा करते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
□□ चौकट
आरोपींच्या नावे असलेल्या मालमत्तेतून रिकव्हर
जनसंघर्ष अर्बन निधी.लि. शाखेतील जमा रक्कमेची अफरातफर करणारे चार आरोपी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयातून पिसीआर घेतल्यावर रक्कमेची अफरातफर कसी केली, निधीतील रक्कमेतून काही नालमत्ता घेण्यात आली का याबाबत कसून चौकशी करु, ठेविदारांच्या रिकव्हरीसाठी मात्र आरोपींच्या नावे असलेली जंगम मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव येत्या १५ दिवसात शासनाला पाठवू, तूर्तास ठेवीदारांनी संयम बाळगावा असे आवाहन तपास अधिकारी, पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधीकारी रामेश्वर वैंजने यांनी केले आहे.