*चोपडा ओम शांती केंद्रात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा...*
चोपडा प्रतिनिधी :
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय ओम शांती केंद्र चोपडा येथे जागतिक महिला दिवस विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात सेवाधारी ग्रुपने शक्ती एक रूप अनेक अशा सुंदर गीतावर नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरी विश्वविद्यालय ओम शांती केंद्राचा परिचय सारिका दीदी यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.... यावेळी सेवाधारी ग्रुपने तेरी विना की बन जाऊ तार या गाण्यावर अप्रतिम असे नृत्य सादर केले .
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या धरणगाव केंद्राच्या संचालिका निता दीदी यांनी मूल्यनिष्ठ समाजात महिलांचे योगदान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमासाठी चोपडा केंद्राच्या संचालिका मंगला दीदी , मुख्य वक्त्या निता दीदी ,पुनमताई गुजराथी,डॉ सुरेखा पाटील, संध्या देशमुख , सारिका दीदी ,करिष्मा दीदी, शीतल दीदी आदी उपस्थित होते.
यावेळी माइंड गेम ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी व इतर ऍक्टिव्हिटीज घेण्यात आल्या..
या दिवसाचा उद्देश महिलांच्या समाजातील कामगिरी, संघर्ष आणि योगदानाचा सन्मान करणे आहे. चोपडा येथील ओम शांती केंद्रातही आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महिला शक्ती आणि महिलांच्या हक्कांवर विशेष लक्ष देण्यात आले. महिला सशक्तकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले.
ब्रह्माकुमारींनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला आणि महिला सशक्तकरण, शाश्वत विकास आणि शांतता निर्माण या क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.
यावेळी महिलांना संदेश देण्यात आला की, त्यांनी त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवावी आणि समाजात त्यांची भूमिका बजावावी.
महिलांच्या योगदानाचा आणि अधिकारांचा सन्मान करण्यासाठी, चोपडा येथील ओम शांती केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


