चारित्र्य, आत्मविश्वास, राष्ट्र सेवेचा संदेश देणारा जयंती सोहळा पंकज विद्यालयात साजरा
चोपडा - संदिप पाटील
पंकज विद्यालय प्राथमिक राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील होते. यावेळी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगत, प्रेरणादायी गोष्टी व भाषणे सादर केली. भार्गवी पाटील, लावण्या बाविस्कर, प्रांजल बोरसे यांची भाषणे प्रभावी ठरली. इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थिनिनी नृत्य सादर केले.
डी एम जैस्वाल व चंद्रशेखर चौधरी यांनी भाषणात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडविणाऱ्या जिजाऊंचे मातृत्व ज्यांनी शिवरायांना शौर्य, सत्य, न्याय, राष्ट्र सेवेचे संस्कार घडविले आणि तरुणांना आत्मविश्वास, चारित्र्य व राष्ट्रभक्तीचा संदेश देणारे स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक आहेत.”
जिजामाता जन्मोत्सव प्रेरणादायी गीत तसेच स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे मनोगत ऐकून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारीवृंद व इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. त्यांना वर्गशिक्षक मयूर पाटील व धनश्री जावळे यांचे मार्गदर्शन मिळाले.सूत्रसंचलन श्रेया मोरे व थोरवी सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
