पंकज विद्यालयात चिमुकल्यांचा आनंदोत्सव
चोपडा - संदिप पाटील
पंकज विद्यालय चोपडा येथे विद्यार्थी मित्रांना विविध व्यवहारिक कौशल्य विकसित व्हावी या प्रमुख उद्देशाने बाल आनंद मेळाव्याच्या आयोजन
इयत्ता चौथी वर्गातर्फे करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन संस्थाध्यक्ष पंकज बोरोले यांनी केले या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायण बोरोले, सौ. दिपाली बोरोले
मुख्याध्यापक एम व्ही पाटील, प्राचार्य आर आर अत्तरदे, मुख्याध्यापक व्ही आर पाटील, प्राचार्य केतन माळी, शिक्षक वृंद,पालक बंधू व भगिनी यांची उपस्थिती होती.
इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थी मित्रांना वर्गशिक्षक डी एम जैस्वाल, मनोज अहिरे व विजय राठोड यांचेमेळावा नियोजन व स्टॉल मांडणी साठी मार्गदर्शन लाभले.
मेळाव्यात 100 पेक्षा जास्त विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल मांडणी विद्यार्थी मित्रांनी व पालकांनी केलेली होती. या सर्व पदार्थ मेजवानीचा आस्वाद पंकज शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी वृंद, पालक व विद्यार्थी मित्रांनी घेतला
बालमित्रांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.स्वतः तयार केलेल्या पदार्थांची विक्री करताना विशेष आनंद जाणवत होता.मेळाव्यातून विद्यार्थ्यांना सर्जनशिलता, आत्मविश्वास, ग्राहक संभाषण कौशल्य गुण दिसून आले. मान्यवरांनी सर्व विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन केले व मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार व्यक्त डी एम जैस्वाल यांनी केले.
