Type Here to Get Search Results !

ATM मशिन मध्ये अडथळा निर्माण करुन कोट्यावधी रुपयांची फसवणुक करणारे आरोपी कानपुर उत्तरप्रदेश येथुन जेरबंद

मुख्य संपादक:- संदीप पाटील 0

 ATM मशिन मध्ये अडथळा निर्माण करुन कोट्यावधी रुपयांची फसवणुक करणारे आरोपी कानपुर उत्तरप्रदेश येथुन जेरबंद


पोलीसराज मिडिया:- संदिप पाटील
दिनांक :- २७/०५/२०२३

म्हसवड येथील प्रसिध्द बँकेच्या म्हसवड, वडुज, दहिवडी, सातारा, धायरी (पुणे) व कामोठे (रायगड या ATM मधुन वेगवेगळ्या विविध बँकाचे ATM कार्डचे सहाय्याने त्यांच्या सात शाखांच्या एमटीएम सेंटर मधील ATM मशीनच्या शटरमध्ये अडथळे निर्माण करुन ATM मशीन मध्ये छेडछाड करुन प्रथमदर्शनी ३,३७,७२,५००/- (तीन कोटी, सदत्तीस लाख, बहात्तर हजार पाचशे रुपये फक्त) काढुन घेवून गुन्ह्यांचा कट करुन फसवणुक केली म्हणुन म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १५५ / २०२३ भादविक ४१७, ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल



आहे. सदर गुन्ह्यांचा तपास राजकुमार भुजबळ, सहा. पोलीस निरीक्षक, म्हसवड पोलीस ठाणे हे करत असुन त्यांनी सदर गुन्ह्यांचे अनुषंगाने आरोपीचा शोध घेतला असताना सदर गुन्ह्याच्या तांत्रिक माहितीवरुन तसेच साक्षीदारांकडे केलेल्या तपासाच्या आधारे आरोपी हे कानपुर राज्य उत्तरप्रदेश येथील असल्याबाबतची माहीती
मिळाल्याने सदर बाबत श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, अरुण
देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / भुजबळ यांनी पोलीस उपनिरीक्षक, विशाल भंडारे, पोहवा अमित झेंडे, अजय जाधव, पोना रविंद बनसोडे, नितीन धुमाळ यांचे एक पथक तयार करुन आरोपीचा तपास करण्याकरीता पथक उत्तरप्रदेश येथे रवाना केले गेले. तसेच म्हसवड पोलीस स्टेशन अंतर्गत एक पथक तयार करुन त्या पथाकाचे मार्फतीने तपास सुरू केला. विशाल भंडारे पोलीस उपनिरीक्षक, म्हसवड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे संयुक्त पथकाने मा. पोलीस अधीक्षक, सो, सातारा, मा. अपर अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली उत्तरप्रदेश येथे जावून सदर गुन्ह्याचा तांत्रिक पध्दतीने तपास करुन गुन्ह्यातील चार आरोपीस ताब्यात घेतले. सदर आरोपींकडुन ४ मोबाईल विविध बँकांचे ए.टी.एम कार्ड हस्तगत करण्यात आलेले आहेत. सदर आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिलेले असुन त्यांचेकडुन आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच आरोपीने वापरलेल्या एटीएम कार्डचे
आधार त्या खात्याची माहीती घेवून सदरची बँक खातील गोठविण्याबाबत व रक्कम परत मिळणेबाबत पत्रव्यवहार करुन आत्तापर्यंत सुमारे ८६,४५,६००/- रुपये रक्कम गोठविण्यात यश आले आहे.
सदर कारवाई श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांचे
मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, सुनिल शेळके, पोलीस निरीक्षक,सायबर पोलीस ठाणे, सपोनि / राजकुमार भुजबळ, म्हसवड पोलीस ठाणे, पोउनि / विशाल भंडारे, अमित पाटील पोउनि पोलीस हवालदार नितीन धुमाळ, अमर नारनवर, अनिल वाघमोडे, सुरज काकडे, नवनाथ शिरकुळे,अभिजित भादुले, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमित झेंडे, अजय जाधव, दहिवडी पोलीस ठाण्याचे पोना/रविंद्र बनसोडे, सचिन ससाणे, वैभव सावंत स्थानिक गुन्हे शाखा यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

News Blogger Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable