अनेर नदीतून येत्या दोन तीन दिवसात पाणी सोडण्याच्या प्रशासनाच्या आश्वासन नंतर रास्ता रोको तात्पुरते स्थगित ...

Advertisement

अनेर नदीतून येत्या दोन तीन दिवसात पाणी सोडण्याच्या प्रशासनाच्या आश्वासन नंतर रास्ता रोको तात्पुरते स्थगित ...

 



चोपडा प्रतिनिधी :- संदिप पाटील

 चोपडा तालुक्यातील १६ गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने धरणातून आरक्षित असलेले पाणी पाणीपुरवठा विभाग व पाटबंधारे विभाग यांचे पाणीपट्टी भरणेबाबत चे धोरणामुळे आवर्तन सोडण्यास विलंब होत होता त्याबाबत शेतकरी कृती समितीच्या वतीने आज रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते.



  त्या पार्श्वभूमी वर जिल्हाधिकारी धुळे यांनी उद्या तात्काळ बैठक लावली असून येत्या दोन तीन दिवसात पाणी सोडण्यात येईल असे आश्वासनश्री ना म व्हट्टे कार्यकारी अभियंता,धुळे पाटबंधारे विभाग,उप अभियंता पी बी पाटील,पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता मोरे यांनी तहसीलदार श्री अनिल गावीत यांचे समक्ष दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी महसूल विभागाचे नेतकर,हरपे,तलाठी पठाण हजर होते.पोलीस निरीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाने बंदोबस्त ठेवला.

  यावेळी कृती समिती चे एस बी नाना पाटील , अनेर काठ संघर्ष आणि निर्माण समिती चे संयोजक प्रदीप पाटील,प्रदेश सचिव एन.एस.यू.आय. चेतन बाविस्कर, व्ही आर चौधरी ,संजय बोरसे,रामकृष्ण कोळी, पुष्पराज पाटील, जीवन बागुल,किशोर दुसाने,बंडू नाना, शाम देवराज,शिवाजी राजपूत,दिगंबर पाटील,किशोर पाटील ,मंगल पाटील,दिनेश राजपूत, जिजाबराव नेरपगारे यांचेसह शेकडो शेतकरी हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या