पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी सरकार समोर लोहारा सुपुत्र अर्जुनभोई यांनी नोंदवला सहभाग
पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
लोहारा प्रतिनिधी:- महाराष्ट्र सरकारच्या मत्स्य विभागाच्या दिनांक १२ मे २०२३च्या शासन निर्णयास तुर्तास स्थगिती मिळविण्याच्या महत्वपुर्ण प्रसंगी लोहारा सुपुत्र अर्जुनभोई यांनी आपला सहभाग नोंदवला ते राज्यातील भोईसमाज क्रांतीदल या सामाजिक संघटनेचे राज्यमहासचिव आहेत. राज्यात भोई, ढिवर, कहार, केवट, कोळी... इत्यादी समाज हा आपल्या पारंपारिक कौशल्यावर मच्छीमारी करत असतो. वरील सदर दिनांकास निर्गमित झालेल्या शासन निर्णयात अनेक त्रुटी असल्याचे आणि पारंपारिक मच्छीमार समाजाच्या हितावर हा शासन निर्णय काही प्रमाणात परिणाम करणारा
होता. राज्यात अनेक ठिकाणी या शासन निर्णयावर असमाधान व्यक्त होतांना दिसले त्यावर शासनाने बोलावलेल्या बैठकीत आपल्या सामाजिक सहकार्यासोबत लोहारा सुपुत्र यांनी सरकारच्या सह्याद्री अतिथीगृहावर सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्यातील समस्त पारंपारिक मच्छीमार समाजघटकासाठी भविष्यात चांगले दिवस येण्यासाठी सरकार पाऊले उचलेल अशी आशा ही त्यांनी आमच्या प्रतिनिधी बरोबर बोलतांना व्यक्त केली.यावेळी प्रकाश लोणारे, दशरथ केवट, अमोल बावणे, सुखदेव मेश्राम, नंदकुमार नगरे, महादेव कदम, एकनाथ काटकर, राजेंद्र मेहेर, किरण गीते, राहुल हरसुले, सुखदेव मेश्राम, सुभाष भारस्कर, अल्का घाटे, वासुदेव सुरजुसे, कोकिळा वाघ, जयदीप पाटील, गजानन मोरे, योगेश झिटे, संजय सुरजुसे, ज्योती चाचे, स्वप्निल साटोटे, रंजीत पढाल, नंदेश ढोले, सोमा मोरे इत्यादी सह मच्छीमार संघर्ष कृती समितीचे अनेक सदस्य बैठकीला उपस्थित होते.


0 टिप्पण्या