केळीच्या पिकात म्हशी चारल्याच्या कारणावरून डोंगरकठोरा येथील ३३ वर्षीय तरूणाच्या गुप्तांगावर विळ्याने वार.
पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
यावल : तालुक्यातील डोंगरकोठारा येथे एका ३३ वर्षीय तरुणाने केळीच्या पिकात म्हशी चारल्याचा राग येऊन एकाने त्याच्यावर विळ्याने वार केला. यात तरूणाच्या गुप्तांगावर जबर दुखापत झाली असुन त्यास गंभीर जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंगरकठोरा ता. यावल या गावातील रहिवाशी चंद्रकांत बळीराम सपकाळे वय ३३ हा तरूण शुक्रवारी गावालगतच असलेल्या पितांबर केशव आढाळे यांच्या शेतशिवारात म्हशी चारत होता दरम्यान त्या म्हशी केळीच्या पत्ती व पिलबाग मध्ये शिरल्या तेव्हा याचा राग येवुन पितांबर आढळे यांनी संतापात चंद्रकांत सपकाळे याच्यावर विळ्याने (बख्खी) त्याच्या गुप्तांगावर वार करून जबर दुखापत केली. तेव्हा शेतात रक्तबंबाळ अवस्थेत चंद्रकांत सपकाळे कोसळला सदर घटना गावात कळल्यावर त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. प्रशांत जावळे, अधिपरिचारीका दिपाली किरंगे, संजय जेधे यांनी त्याच्यावर प्रथम उपचार केले मात्र, त्याची प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सुनंदाबाई बळीराम सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पितांबर केशव आढाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.

0 टिप्पण्या