चोपडा शहरात RRR Centre सुरू “मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर” अभियानांतर्गत नगर परिषदेचा उपक्रम
पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) “मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर” हे अभियान देशभरात राबविणेचा निर्णय घेतला असुन या अभियानाअंतर्र्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना “रिड्युस, रियुज आणि रिसायकल” सेंटर म्हणजेच RRR केंद्र स्थापन करणेबाबत निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने चोपडा नगरपरिषदे मार्फत स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियान, कचरा मुक्त शहर अभियान, मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अभियान अंतर्गत न.प. परिसरात दि.20/05/2023 पासुन “रिड्युस, रियुज आणि रिसायकल” सेंटर म्हणजेच RRR केंद्र स्थापन करणेत आलेले आहे. त्याअंतर्गत चोपडा शहरातील नागरिकांना आवाहन करणेत येते की, आपलेकडील निरुपयोगी वस्तु जसे कपडे, पादत्राणे, भांडी, पुस्तके, प्लास्टिकच्या वस्तु, शोभेच्या वस्तु, स्टेशनरी इ. प्रकारच्या वस्तु न.प. RRR केंद्रात जमा करावे. जेणेकरुन कच-याची निर्मिती कमी होईल, कच-याचा पुर्नवापर होईल किंवा कच-यापासुन नवीन वस्तु तयार केल्या जातील. त्यामुळे आपल्या शहराच्या सौंदर्यी करणात भर पडेल व आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील. तसेच नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती.
(हेमंत निकम)
मुख्याधिकारी
चोपडा नगरपरिषद, चोपडा

