जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई , मोठा शस्त्रसाठा जप्त | 2023 | Latest
पोलीसराज मिडिया :-
जळगाव ; – जिल्हा (District) पोलिसांनी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाया केलेल्या आहे . यात मोठा शस्त्रसाठा पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे . जळगाव स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी पथक आणि एमआयडीसी पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांच्या कारवाईत एकूण ४ गावठी कट्टे, ५ तलवारी, दोन चोपर, १ चाकू आणि जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा (jalgaon) पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
जळगाव जिल्ह्यातील (District) गुन्हेगारी रोखण्यासाठी गेल्या जिल्हा(District) गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सूचना केल्या होत्या. महिनाभरात जिल्हा (District) पोलिसांकडून कारवायांना गती देण्यात आली असून गुन्हेगारांवर एमपीडीए, मोकका, तडीपारच्या कारवाया सुरू आहेत. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी जळगाव जिल्हा(District) पोलिसांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून गावठी कट्टे, तलवारी, चोपर, चाकू असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, परिरक्षावधीन उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, आप्पासो पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश बुवा आदी उपस्थित होते.

