महाराष्ट्राचे नामकरण करूण शिवराष्ट्र करण्यासाठी २१ मे रोजी पत्रकार परीषद संपन्न
जळगाव ||- दि.२१ मे २०२३ रोजी जळगाव येथे झालेल्या आजच्या पत्रकार परिषदेच्या विषयाची व्याप्ती ही मोठी आहे. त्यात प्रामुख्याने आपण म्हणजे जन मन असं म्हणत आहे की महाराष्ट्र राज्य हे नाव सर्व परिचित आहे. त्याचे नामकरण करून शिवराष्ट्र असे करण्यात यावे. त्याबाबत पत्रकार परिषद बोलवणारा व्यक्ती म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात जनतेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात दिनांक 8/ 12/ 2022 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून कानिफनाथ अध्यादेश या शीर्षकाखाली निवेदन देण्यात आले आहे. सदरच्या निवेदनात शिवराष्ट्र असे नाव का ठेवावे? याबाबतची भूमिका लिखित स्वरूपात देण्यात आली आहे. सदरचे निवेदन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चेसाठी सार्वत्रिक करण्यात येत आहे. त्याची एक प्रत या प्रेस नोट सोबत आपणा सर्वांना वितरित केली आहे.
शिवराष्ट्र नामांतरण आणि स्वतंत्र राज्य निर्मिती याचा इतिहास हा फार मोठा आहे. पुरातन काळापासून देश प्रदेश शहरांची नावे ही प्रामुख्याने बदललेली आहे.* सांस्कृतिक महाराष्ट्र*या शासकीय ग्रंथाच्या संदर्भानुसार की जो मधु मंगेश कर्णिक यांनी संपादित केला आहे. त्या माहितीनुसार महाराष्ट्र या शब्दाच्या व्याप्ती बाबत एक मत आढळत नाही. सहाव्या शतकामध्ये महाराष्ट्र या साधनेचा& प्रथम येतो. 'म हाराठी'या शब्दाचा वापर सातवाहना ंचा लेखातून त्याचप्रमाणे त्यांच्या उत्तर काळातील काही नाण्यात आढळून येतो. जॉन विल्सन यांनी मोल्सवर्थ कोशात महाराष्ट्र म्हणजे महार+राष्ट्र=महारांचे राष्ट्र अशी एक लोक व्याप्ती सुचवली आहे. वैद्य यांच्या मते सातवाहन यांच्या साम्राज्यात गोपराष्ट्र,मल्हारराष्ट्र ,पांडू राष्ट्र, इत्यादी वसाहती करून दक्षिणेत आले आणि ते एका सत्तेखाली येऊन त्यांचे एक मोठे राष्ट्र झाले. या मोठ्या राष्ट्राला महाराष्ट्र असे नाव पडले. राजाराम शास्त्री यांच्या मते. मर हट हा जनवाचक शब्द. मठ या शब्दाची प्रकृती दिसतो.
राष्ट्र म्हणजे राष्ट्रात अधिकाऱ्याने काम करणारा मनुष्य. यासारखे अनेक संदर्भ मिळतात तर काही ठिकाणी राठी लाठीया राज्यांच्या वंशावळीनुसार अपभ्रंश होऊन मराठी महाराष्ट्र असे नामकरण झाले आहे. असा फार मोठा इतिहास आहे. मला या ठिकाणी जन् मत म्हणून नोंदवायचे आहे ते असे की भगवान शिव यांची आपण सर्व जण श्रद्धेने पूजा अर्चना करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातच जन्मले त्यांची कर्मभूमी ही इथलीच. अहिल्याबाई होळकरांनी शिवपिंड हातात घेऊन राजकारभार यशस्वीपणे चालवला आहे. तर मग ज्याच्या मुळातून विमुक्तपणे संचार, विमुक्त पणे भ्रमण, विमुक्तपणे नवनिर्माण, विमुक्तपणे शासन, विमुक्तपणे न्यायदान, करण्याची प्रक्रिया विमुक्तपणे सर्वांचं पालन पोषण देखरेख करण्याची क्षमता आहे. त्याला सीमांचे कुठलेही बंधन नाही. अशा सर्व अर्थाने पवित्र कॉस्मिक एनर्जी असणारा शिव या शब्दाने शिवराष्ट्र म्हणून प्रथम उच्चारण होत असेल तर त्यात आक्षेपहार्य तरी काय.?
आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये एक मे या दिवशी शिवराष्ट्र राज्यध्वज हा फडकविण्यात यावा याबाबतचे पूर्वनियोजित निवेदन हे दिनांक बावीस मे 2023 रोजी सोमवारी दिले जाणार आहे. त्यापूर्वी सदरचा हा विषय जनमताचा असल्या कारणामुळे तो निवेदन देतेवेळी शिवराष्ट्रभर चर्चेला यावा. सदरचा विषय हा प्रसारमाध्यमांच्या साह्याने जनतेपर्यंत सहज पोहोचावा. आणि सदरच्या दोन्ही विषयांचा संबंध हा असल्या कारणामुळे पत्रकार परिषदेत चर्चेसाठी घेण्यात आला आहे. दिल्या जाणाऱ्या निवेदनाची प्रत या प्रेस नोट सोबत जोडण्यात आलेली आहे. इंटरनेट सोर्सेस मधून माझ्यापर्यंत आलेली माहिती आणि मला आकलनी पडलेली माहितीनुसार काही राज्यांचे राज्य झेंडे हे आहे. शिवराष्ट्र ध्वज हा कसा असावा याबाबत विचार विनिमय निर्णय प्रक्रिया ही सुरू आहे. तो कसा असावा याबाबत मी निवेदनात लिहिले आहे. प्रामुख्याने त्रिशूल हे दैवी शस्त्र आहे. भवानी तलवार स्वराज्याची निर्मिती केली आहे. ती पण दैवी सदैव हवेत वास करणारे शस्त्र म्हणून आहे. म्हणून सदरची तलवार शिवाजी महाराज आणि भगवान सूर्य यांचे आसन हे सोन्याचे होते. सोन्याचे आहे. भगवान सूर्य कमी अधिक प्रमाणात जगभरात उगवतो जगभरातील 15 पेक्षा अधिक राष्ट्रीय झेंड्यांवर सूर्याची प्रतिमा आहे. मी तर अजून असं म्हणेल हिरव्या रंगाच्या पंख असणाऱ्या उडत्या घोड्याच्या पाठीवर सूर्याची प्रतिमा ही चिन्हाच्या स्वरूपात यावी या लिखाणाला सखोल असा शास्त्रीय आधार आहे. अशी माहीती एका पत्राव्प्रादारे प्ध्याप्राध्या आशिष जाधव यांनी दिली.
![]() |
| प्रा.आशिष जाधव |

