पोलीसराज मिडिया:-
कुसुंबा :- उन्हाळ्यात रक्त तुटवडा निर्माण होत असल्याने पुढाकार.विवाहासारख्या पवित्र विधीत सामाजिक भावना जोपासता यावी यासाठी कुसुंबा (ता.जि.जळगाव) येथील विवाह सोहळ्यात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.रक्त दान हे महादान असल्यामुळे नवरदेवासह ११ दात्यांनी रक्तदान केले. ची.निर्मल व चि.सौ.का.तेजस्वी यांचा विवाह कुसुंबा येथील अहिंसातिर्थ आर.सी.बाफना.गोशाळेत पार पडला.यावेळी ज्युनिअर चार्ली फाँडेशन औरंगाबाद चे कलाकार सुमित पंडित यांनी आपल्या चार्ली चाँप्लीन च्या वेशभूषेत मुख अभिनयातुन लग्न समारंभास आलेल्या सर्व पाहुण्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवुन देत होते.चेतन पाटील माणुसकी समुह जळगाव जिल्हा उप अध्यक्ष यांच्या प्रस्तावातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वरमाला टाकल्यानंतर लगेच नवरदेवासह ११ दात्यांनी रक्तदान केले,संदीप पाटील,अमोल पाटील,
प्रदीप पाटील,गजानन मोरे,महेश पाटील,रितेश भानवकर ,चेतन पाटील,तुषार नाथ,वैभव उगले,सचिन पवणे आदिनी रक्त दान केले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माणुसकी रुग्ण सेवा समुहाच्या टिम ने केले.
प्रदीप पाटील,गजानन मोरे,महेश पाटील,रितेश भानवकर ,चेतन पाटील,तुषार नाथ,वैभव उगले,सचिन पवणे आदिनी रक्त दान केले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माणुसकी रुग्ण सेवा समुहाच्या टिम ने केले.