प्रा.डॉ.विजय का.पाटील यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार प्रदान
चोपडा प्रतिनिधी :- संदिप पाटील
चोपडा येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज कला व विज्ञान महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा.डॉ.विजय का.पाटील यांना नाशिक जिल्हा शिवसेना क्रीडा विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार श्री.दादाजी भुसे यांच्या हस्ते रविवार दिनांक 25 जून रोजी प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ऑलिम्पियन अर्जुन पुरस्कार विजेते मा. सईद जलालुद्दीन रिझवी,मा.श्री.भाऊसाहेब चौधरी, खासदार मा.हेमंत गोडसे,शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख मा.अजय बोरस्ते,मा.अशोक दुधारे, क्रीडा विभागाच्या उपसंचालिका श्रीमती सुनंदा पाटील,शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा.आनंद खरे व शिवसेना संपर्कप्रमुख राजू लवटे आदी उपस्थित होते.
प्रा.डॉ.विजय का.पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले,उपाध्यक्ष अविनाश राणे,संचालक पंकज बोरोले,सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.आर.आर.अत्तरदे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक एम.व्ही. पाटील,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही.आर. पाटील,प्राचार्य मिलिंद पाटील, केतन माळी,रेखा पाटील मॅडम, प्राध्यापक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,पंकज समूहातील सर्व कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.

