विठ्ठल अॅफ्रो बि सी आय तर्फे सुधारीत कापूस आदर्श पध्दत प्रकल्प बद्दल तांदळवाडीत मार्गदर्शन
संदिप पाटील (ब्युरो न्युज)
तांदलवाडी ता.चोपडा येथे आज दि.१ जुलै रोजी हरीत क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल अॅफ्रो बी सी आय तर्फे सुधारीत कापूस आदर्श पध्दत प्रकल्पाबाबत माहीती देवून जयंती साजरी करण्यात आली.
शेतकर्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन व शाश्वत दर्जाचा कापुस पिकविणे तसेच जैविक खते व औषधे वापरणे,रासायनिक खतांचा वापर कमी करणे याविषयी माहिती कृषी मित्र सुधाकर धनगर,गोपाल पाटील यांनी माहीती दिली.चोपडा साखर कारखान्याचे सदस्य गोपाल धनगर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विठ्ठल अॅफ्रो बी सी आय चे कार्य मी समोरून पाहीले असून ते वाखाणण्या जोगे आहे .लासूर,हींगोणे, चौगाव परीसरात संसथेने पाणी आडवा पाणी जिरवा सारखे मोठे प्रकल्प हाती घेवून परीसरात पाण्याची उपलब्दता केली आहे.सेंद्रिय शेतीवर शेतक-यांनी भर द्यावा ,रासायनिक खते टाळावीत असे आपल्या मनोगतात सांगीतले.
भारत हा कृषिप्रधान देश आहे.म्हणून देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषीदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते 'पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा' म्हणून ओळखले जातात. भूमिहिनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवीण्याचे तसेच कृषीसंस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले.
कार्यक्रमाला उपसरपंच प्रविण धनगर,चोपडा साखर कारखान्याचे विद्यमान सदस्य गोपाल धनगर,तांदलवाडी विवीध कार्यकारी विकास सोसायटीचे अध्यक्ष दिपक पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

