दोंदवाडे येथे वादळी वा-याने घराची पत्रे उडाली
जून ०४, २०२३
0
दोंदवाडे येथे वादळी वा-याने घराची पत्रे उडाली
दोंदवाडे (चोपडा तालुका): चोपडा तालुक्यातील दोंदवाडे परिसरात ४ जून रोजी वादळी वारा व पावसामुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली असून, संसार उघड्यावर आले आहेत.४ जून रोजी दुपारी ११.४५ वाजता आलेल्या वादळामुळे गावकर्यांची चांगलीच पळापळ झाली. यामध्ये दोंदवाडे येथी गजानन कोळी, व आदी
ग्रामस्थांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली आहेत.गजानन कोळी यांच्या घराचे जास्त नुकसान झाले आहे.त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. परीसरात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने नागरीक प्रभावित झाली होती. क्षतिग्रस्त झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.


