महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सलाम , तप्त ऊन्हातही सेवा बजावत विजपुरवठा सुरळीत करण्यात यश

Advertisement

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सलाम , तप्त ऊन्हातही सेवा बजावत विजपुरवठा सुरळीत करण्यात यश

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सलाम , तप्त ऊन्हातही सेवा बजावत विजपुरवठा सुरळीत करण्यात यश पोलीसराज मिडिया :- संदिप डी पाटील पाऊस आणि वादळमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. चोपडा तालुक्यात निमगव्हाण परीसरात काल दि.४ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या जवळपास भयंकर वादळ होते.त्यामुळे शेतातील अनेक खांब उन्मळून पडले होते.तसेच दुपार पासून गावातील विजपुरवठाही खंडीत झाला होता.वादळ शांत होताच महावितरणचे कर्मचारी आपली सेवा बजावतांना दिसले.निमगव्हाण , तांदलवाडी ,दोंदवाडे परिसरातील खंडीत झालेला वीजपुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत व्हावा म्हणून महावितरणचे अधिकारी जे.ई.धांडे यांनी आपल्या मार्गदर्नाखाली परीसरातील विजपूरवठा सुरळीत केला. सध्या ऊन्हाळी कापसाची लागवड सुरू असून पीकांना पाण्याची सोय व्हावी,बरेच शेतकरी ऊन्हळी कपसाची लागवड करीत आहेत म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तावसे फीडर तसेच चहार्डी फीडरचे विजेचे खांब ऊभे करण्यास महावितरणचे कर्मचारी सज्ज झाले. आपल्या जीवाची पर्वा न करता पूर पाण्यातही हे कर्मचारी आपली सेवा बजावतात.काही ठीकाणी विजेच्या तारांवर चालत विज पुरवठा सुरळीत करतांना दिसतात संध्याकाळपर्यंत आपण घरी सुरळीत जाऊ की नाही याची शाश्वतीच नसते.माणसांप्रमाणे महीलाही विजपुरवठा सुरळीत करतांना दिसतात. निमगव्हाण सबस्टेशन चे विज पूरवठा अधिकारी जे.ई.धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ललीत नन्नवरे ,रामकृष्ण सानप,योगेश धनगर,गोविंदा वाघ यांनी काम पाहीले. म्हणून मी शेवटी एकच म्हणेल महावितरण चर्मचारी तुमच्या कार्याला सलाम...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या