तहसिल कार्यालयाने दिलेल्या रस्ता वादग्रस्त ठरल्याने ,शेताच्या रस्त्यावरुन एकाला केले ठार.
दिग्रस :- पोलीसराज मिडिया
तालुक्यातील वडगांव(आरंभी) येथील एका शेताला तहसील कार्यालयाने दिलेल्या रस्ता ठरला वादग्रस्त रविवार १२ जूनला त्या रस्त्यावरुन चांगलाच वाद होऊन एका ६० वर्षीय इसमाला कुऱ्हाडीने वार करुन ठार केल्याने चांगलीच खळबळ उडाली.
आरंभी जवळील वडगांव येथील पांडुरंग चव्हाण यांना विठ्ठल राठोड यांच्या शेतातून रस्ता देण्यात आला होता.हा निर्णय विठ्ठल राठोड याला मान्य नसल्याने याची खुन्नस विठ्ठलसह इतर सहा जणांनी धरली आणी चक्क कुऱ्हाडीने पांडुरंग चव्हाण वर घाव घातले, त्यात तो गंभीर जखमी झाला, ताबडतोब उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात त्याला हलवण्यात आले होते.सोमवार, १२ जुनला पहाटे ४ वाजताचे सुमारास पांडुरंग चव्हाण दगावला.
या संपूर्ण घटणेची माहीती ठाणेदार धर्मराज सोनुने यांनी देत मुख्य आरोपी विठ्ठल राठोड , राहूल जाधव, खुशाल राठोड, कैलास राठोड आदींसह इतरांना अटक करुन त्यांच्यावर खुन करणे अंतर्गत कलमान्वये गुन्हे दाखल केल्याचे सांगीतले.
या घटणेचा पुढील तपास सुरु असून यापुढे कोणताही अनुचित प्रकार वडगांव परिसरात घडणार नाही याची दक्षता दिग्रस पोलीस घेत आहेत.

0 टिप्पण्या