जयश्री दादाजी हायस्कूल येथे महसुल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संवाद साजरा
तांदळवाडी (ता.चोपडा) तांदलवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूल येथे महसूल व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संवाद साधला गेला.
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त व्हावी, नागरिकांना या योजनांचा योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उद्देशाने 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
या सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी शाखेचे मुख्याध्यापक ए. एल. चव्हाण सर , मंडळ अधिकारी श्री आर जे बेलदार,तलाठी एल बी हिंगे,निमगव्हाण येथील तलाठी कल्पेश कुवर,चहार्डी - अकुलखेडा येथील तलाठी कुलदीप पाटील,तलाठी मुकेश देसले, घाडवेल येथील तलाठी गजानन पाटील ,चोसाका संचालक गोपाल धनगर,तांदळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रविण धनगर,तांदळवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन दिपक पाटील, निमगव्हाण येथील पोलीस पाटील पवन भिल्ल, दोंदवाडे येथील पोलीस पाटील नितीन पाटील,दिनेश भास्कर सपकाळे सरपंच निमगव्हाण ,संजय बि-हाडे उपसरपंच निमगव्हाण,धनराज पाटील ग्रामपंचायत सदस्य निमगव्हाण... यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दि. 2 ऑगस्ट रोजी तांदळवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूल येथे युवा संवादाचे आयोजन महसूल विभागाकडून करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध दाखल्याबाबत ऑनलाईन प्रक्रियांची माहिती देण्यात आली,शेतक-यांना सातबारा पोटखराब दुरुस्ती,तर १८ वर्ष पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे अशी माहीती मंडळ अधिकारी आर.जी.बेलदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून दिली.
महसूल सप्ताहांतर्गत विभागातर्फे दि. 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जनसामान्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे व शेतकऱ्यांना सातबा-याचे वितरण करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे व शेतकऱ्यांना सातबा-याचे वितरण करण्यात आले.




