तांदळवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निश्चल पाटील यांची बिनविरोध निवड
चोपडा प्रतिनीधी :- संदिप पाटील
सन २०२० मध्ये झालेल्या निवडणूकित सरपंच म्हणून सिंधुताई भिल्ल तर उपसरपंच पदी प्रविण धनगर यांची निवड करण्यात आली होती.अडीच वर्ष झाल्यानंतर प्रविण धनगर यांनी उपसरपंच पदाचा मागील काही दिवसापूर्वीच राजीनामा दिला होता.तांदळवाडी ग्रामपंचायत मधुन रिक्त जागेसाठी निश्चिल मुरलीधर पाटील यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक प्रशांत म्हाळके तर अध्यक्ष म्हणून सरपंच सिंधुताई भिल्ल यांनी काम पाहिले.यावेळी सात पैकी सहा सदस्य ऊपस्थित होते. यावेळी चोसाकाचे विद्यमान सदस्य श्री गोपाल धनगर, तांदळवाडी विवीध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन श्री दिपक पाटील , ग्रामपंचायत सदस्य श्री प्रविण धनगर.श्री संजय धनगर, सौ.संगिताताई धनगर यांनी शुभेच्छा दिल्या.

