रक्षाबंधनाच्या दिवशी भद्र की भद्रा ? सोशल मिडियावर दोघांची चर्चा
पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
आज रक्षाबंधन, हिंदु धर्मातील पवित्र असा बहीण भावाच्या नात्याचा सण.बहीण भावाला राखी बांधते आणी भाऊ त्या राखीचे ऊपकार आयुष्यभर फेडतो.आयुष्यभरासाठी एक धागा खुपच काही सांगून जातो.
आज भद्रा आहे असे अनेक पंचांग कर्ते सांगतात.परंतू दाते पंचांगचे कर्त्यांनी दिवस भरात केव्हाही रक्षाबंधन करू शकतात असा खुलासा त्यांनी एका व्हिडिओतून सोशलिडियावर केला आहे.
तर दुसरीकडे पंडित मिश्रा यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा असल्याने रात्री नऊ वाजता राखी बांधावी असे सांगितल्याची जोरदार चर्चा महीलांमध्ये सुरू आहे.
कोण आहे भद्रा?
भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असे असले तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेलं आहे. धार्मिक दृष्टिकोनातून भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आणि शनीदेवाची बहीण आहे. भद्रा देखील शनीदेवाप्रमाणेचं शीघ्रकोपी, विघ्नसंतोषी होती. बालपणापासूनच ती ऋषीमुनींच्या दैवी, धार्मिक कार्यात, उपासनेत विघ्न आणत असे. सूर्यदेवानी ब्रह्मदेवाकडे भद्रेच्या उपद्रवाची तक्रार केली. त्यावर ब्रह्माजींनी भद्राला समजावून सांगितले आणि विष्टी करणात स्थान दिले. भद्रा काळात केलेले कार्य शुभ फल देत नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करेल. भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरणार नाही अशी पौराणिक मान्यता आहे.
ही फक्त पौराणिक माण्यता आहे.सण साजरे करा,सगळे दिवस,सगळे देव,सगळेच वार हे शुभ असतात यात काही शंका नाही.
0 टिप्पण्या