चोपडा तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा - पिके समाधानकारक असली तरी पिकांची वाढ नाही

Advertisement

चोपडा तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा - पिके समाधानकारक असली तरी पिकांची वाढ नाही

 चोपडा तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा - पिके समाधानकारक असली तरी पिकांची वाढ नाही


बारीश होना बंद हो गयी,
जरा मालूम करो बादल तो नही बेच दिये!


पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
सध्या मोसमी पावसाचे ढग तयार होतांना दिसत आहेत.यामुळे तालुक्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. राज्याच्या संपूर्ण भागात मॉन्सून दाखल झाला असला तरी या भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून, अद्यापही जोरदार पावसाची  प्रतिक्षा आहे.
  उत्तर महाराष्ट्रात यावर्षी अडीच तीन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही.थोड्याफार सरी येतात त्यामुळे आज मितीस पिके चांगली दिसत असले तरी मात्र वाढ समाधानकारक झालेली नाही, या वर्षी उत्पन्न कमी होईल हे शेतकरी राजाला दिसत असले तरी कोणाजवळ आपली व्यथा मांडणार ? कारण शासनाच्या परीपत्रकाच्या पुढे जाताच येत नाही. नदी नाले न वाहिल्याने पिण्याच्या पाण्याचा व रब्बी चा प्रश्न निश्चित गंभीर होऊ शकतो.

   जळगाव,धुळे व नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या साधारणपणे ३०%ते ३५% पाऊस झाला असून गेल्यावर्षी आजच्या तारखेला जेवढा झाला होता त्याचेत २५-३०%कमी पाऊस झाला आहे. काल संध्याकाळी जळगाव जिल्ह्यात ब-याच ठीकाणी पिके तारण्यापूरती हजेरी लावली ,पण यावर काय होणार ?

मध्य प्रदेशात झालेल्या पावसाने नद्या वाहताना दिसत असल्या तरी आपल्या कडील नदी नाले कोरडे आहेत.
हतनूर- गिरणा धरणाचे पाणी तापी नदी पात्रातून सोडले जाते, ते कुठेही न अडवता सरळ वाहून जात आहे,दरवर्षी ते कॅनाल मधून नदी नाल्यात सोडले जायचे त्यामुळे खूप पाणी जमिनीत जिरायचे.मात्र अजून देखील तसे आदेश झाल्यास चोपडा,यावल,रावेर तालुक्याचा खूप फायदा होईल.
सध्या वातावरण अधुनमधुन १००% ढगाळ होते व ते सारे पाण्याचे ढग असून फक्त वातावरणात आद्रता तयार होत नसल्याने पावसात रूपांतर होऊ शकत नाही त्यासाठी शासनाने  कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केल्यास पिके व हंगाम वाचवता येईल.याने शेतकऱ्यांचा फक्त शेतीचाच नाही तर भविष्यातील पिण्याचे पाण्याचे देखील प्रश्न सुटतील व जनतेचे हाल वाचतील यात तीळ मात्र शंका नाही.






  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या