शिरावर ११ लाखाचे बक्षीस असणा-या जहाल महिला रजनी वेलादी नक्षलीचे पोलिसा समोर आत्मसमर्पण
बाजूला पोलिस अधीक्षक नीलोत पल व सोबत अधिकारी गण छाया चित्रात
पोलीसराज मिडिया :-
(विदर्भ प्रमुख-बबनराव इंगळे)
शिरावर ११ लाखाचे बक्षीस असणा-या जहाल महिला रजनी वेलादी नक्षलीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
७ ऑक्टोबर नक्षल चळवळीला कंटाळलेल्या जहाल महिला नक्षलीने राज्य सरकारच्या आत्मसमर्पण योजनेनुसार गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले . तिच्यावर शासनाने ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते ... रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी ( २८ ) असे तिचे नाव असून , तिने गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यापुढे आत्मसमर्पण केले . गडचिरोली आजपर्यंत पोलिसांसमोर एकूण ५८६ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असून , गडचिरोली पोलिसांसाठी हे मोठे यश मानले जात आहे . रजनी ही छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या ईरुपगट्टा येथील रहिवासी आहे . महाराष्ट्र शासनाच्या माहिती मिळाल्यानंतर तिने योजनेची माहिती मिळाल्यानंतर तिने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले . ती २००९ मध्ये फरसेगड दलमध्ये भरती झाली होती . तिची २०१० मध्ये ओरच्छा दलमध्ये बदली झाली . २०१३ मध्ये नॅशनल पार्क एरिया डॉक्टरांच्या चमूमध्ये सहभागी झाली . नंतर एरिया कमिटी मेंबर म्हणून २०१५ पर्यंत कार्यरत राहिली . सन २०१५ ला सांड्रा दलममध्ये बदली होऊन नक्षल चळवळीत कार्यरत होती . २०१५ च्या गुंडम जंगलातील चकमकीत तिचा सक्रिय सहभाग होता . २०१७ मध्ये बेजी ते येर्रागुफा या मार्गावरील अॅम्बुश चकमकीतही ती सहभागी होती . या चकमकीत १२ पोलिस हुतात्मा झाले होते . २०१८ मध्ये आरेवाडा जंगल व २०१९ मध्ये बोरामजी जंगल परिसरात झडलेल्या चकमकीतही तिचा सहभाग होता . २०२०-२१ मध्ये छत्तीसगडमधील एका निर्दोष व्यक्तीच्या हत्येतही तिचा सहभाग होता . राज्य सरकारने रजनीवर ६ लाख रुपयांचे , तर छत्तीसगड सरकारने ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते .
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस तिला मिळणार आहे . २०२२-२३ या वर्षात आतापर्यंत एकूण १३ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी यावेळी दिली.

