गुर्जर सामाजाची युरोपीयन पार्लमेंट मध्ये आजही नवी ओळख कायम :- एम.व्ही.पाटील सर
पुनम चव्हाण हीचे साॅफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड
पोलीसराज मिडिया :- संदिप पाटील
यावल तालुक्यातील तालुक्यातील कोसगाव येथील रहिवाशी पुनम विजय चव्हाण हिची युरोपियन पार्लमेंट मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाल्याने जळगाव जिल्ह्यातील दोडे गुजर संस्थाचे संचालक श्री एम.व्ही पाटील सर यांनी कौतूक केले.
पोलीसराज मिडियाशी बोलतांना त्यांनी सांगितले की युरोपियन पार्लमेंट डेव्हलपर या पदासाठी भारतातून 17000 विद्यार्थी यांनी ऑनलाईन परीक्षा त्यातून पुनम हीने प्रथम क्रमांकाने पास होवून गुजर समाजाचे नाव लौकिक केले
समाजातून असे अनेक बंधु भगिनी आहेत की ते उच्च शिक्षित आहेत,मुलांनी स्पर्धांना सामोरे जाऊन आपल्या ऊन्नती कडे लक्ष दिले पाहीजे.विद्यार्थ्यांना चालना दिल्याने ते परराज्यात समाजाचे नाव कोरतील याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. मी दोडे गुर्जर संस्थानच्या वतीने पुनम चव्हाणवला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.
पुनम चव्हाण हिचे शिक्षण भुसावळ सेंट अलायसिस शाळेत दहावीपर्यंत शिक्षण झाले व बारावीपर्यंत औरंगाबाद येथे तर इंजिनिअरिंगला नाशिक येथे तिचे शिक्षण झाले अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये वडिलांनी तिचे शिक्षण केले
पुनम ही मनवेल तालुका यावल येथील आदिवासी आश्रम शाळेचे शिक्षक विजय चव्हाण सर राहणार कोसगावकर यांची मुलगी असून तिच्या दैदिप्यमान अशा यशामुळे चव्हाण परिवार कोसगाव सह विवीध जिल्ह्यातील दोडे गुजर समाजामध्ये तिचे कौतुक होत आहे.

