चोपड्यातून अडीच लाखांची रोकडची पिशवी लांबविली

Advertisement

चोपड्यातून अडीच लाखांची रोकडची पिशवी लांबविली

चोपड्यातून अडीच लाखांची रोकडची पिशवी लांबविली

चोपड्यातून अडीच लाखांची रोकडची पिशवी लांबविली

जळगांव चोपडा



 बँकेतून अडीच लाख रूपये काढले रक्कमेची पिशवी ही दुचाकीच्या हॅण्डलला लावलेली असतांना अज्ञात चोरट्याने नजरचुकवून लांबविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना चोपडा शहरातील आंबेडकर चौकात घडली आहे.


चोपडा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजीपाला घेण्यासाठी आलेले मदन माधवराव पाटील (वय-६२) रा.कुसुंबा ता.चोपडा हे दुचाकीनी उभे होते. दरम्यान भाजीपाला घेण्यापूर्वी त्यांनी बँकेतून अडीच लाख रुपयांची रोकड काढलेली होती. 7 रोजी दुपारी २.३० ते २.४५ सुमारास त्यांनी काढलेली पैशांची पिशवी ही दुचाकीच्या हँडलला अडकवलेली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून दुचाकीला हँडलला लावलेली रोकडची पिशवी घेऊन पसार झाला. दरम्यान हे बाब लक्षात आल्यानंतर वृद्ध शेतकऱ्याने सर्वत्र शोध घेतला. परंतु या संदर्भात काहीही माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी ७ वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात चोपडा पोलीस ठाण्यात जिल्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस काही हरिश्चंद्र पवार करीत आहे.



via Blogger https://ift.tt/mICK0aM
November 08, 2023 at 04:06PM

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या