Type Here to Get Search Results !

चुंचाळे येथील एकास बाल लैंगीक अत्याचार प्रकरणी 20 वर्ष संमश्र कारावासाची शिक्षा

मुख्य संपादक:- संदीप पाटील 0
चुंचाळे येथील एकास बाल लैंगीक अत्याचार प्रकरणी 20 वर्ष संमश्र कारावासाची शिक्षा



चोपडा प्रतिनीधी :- संदिप पाटील

चोपड़ा शहर पो स्टे गुरन 481/2023, रात्र खटला केस न 48 2023, गुन्हा भादवि कलम 376 ए.बी. व बालकांचे लैगीक अपराधापासुन सरक्षण कायदा 2012 चे कलम 4,8,10,12 प्रमाणे मधील आरोपी ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग कोळी
3.4 52 रा. चुचाळे, ता. चोपडा, जि. जळगांव यानी दिनांक 26/08/2023 रोजी सकाळी 08:00 वाजेच्या सुमारास चुंचाळे गावी आरोपीच्या घरात घडलेला आहे. यातिल फिर्यादी पिळीताची आजी रा. चुचाळे ता. चोपडा जि. जळगांव यांच्या फिर्यादीवरुन पिडीतास तंबाखुची
पूड़ी आणण्याच्या बाहाणाने घरात बोलवून पिडीताच्या गुप्तांगवरती पप्पी घेवून, स्वताचे
गुप्तांग पिडीतेव्या हातात देवून, व पिडीतेचे सर्व कपडे काढून तिच्यावर लैगिक अत्याचार केला, त्यावेळेस आरोपीचा मुलगा घरी परत आल्याणे दरवाजा ठोठावल्याने आरोपी घाबरुन दरवाजा उघडला पिडीता घाबरुन रडत्त रडत घरी गेली. व त्यानंतर संपूर्ण घटणा आजीस सागितली असता पिडीताने आजीला आरोपीताचे घर दाखविले. पिडीता ही 08 वर्षाची असल्याने पिडीताची आजी सोबत जावून, चोपडा शहर पो.स्टेशनला दिनांक 26/08/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला, आरोपीस अटक झाली. तपासी अधिका-यांने तपास 30
दिवसाच्या आत तपास संपवला असता सदरचा खटला मा. न्यायालयात पुढील 3 महिण्यात तात्काळ बोलवण्यात आला. सदर खटल्याच्या कामी मा. जिल्हा न्यायाधीश 1 श्री. पी. आर.चौधरी साहेब यांचेपुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले, त्यात सहा. सरकारी वकील अॅड.किशोर. आर. बागुल मंगरुळकर यांनी एकुण 08 साक्षीदार तपासले. पैकी फियांदी, पिडीता इतर साक्षीदार, तसेच वैदयकिय अधिकारी सरकारी पंच व तपासी अधिकारी
सहा पोलीस निरीक्षक सतोष भागवत चव्हाण यांची साक्ष ग्राहय धरून आरोपीस सदरबा खटल्या कामी आलेल्या पुराव्या वरून गुन्हा सिध्द झालेने गुन्हा भा.द.वि कलम 376-ए.बी. तसेब बालकांचे लैंगीक अपराधापासून सरक्षण कायदा 2012 चे कलम 4,8,10,12 प्रमाणे.शिक्षा कायदयाच्या मुल्याप्रमाणे कलम 376-ए.बी किंवा बा.ल.अप.स.का. 4 प्रमाणे
कोणत्याही एक शिक्षा देता येते म्हणून मा. न्यायालयाने आरोपीतास बा.ल.अप.स.का. कलम 4 प्रमाणे आरोपीतास 20 वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली तसेच कलम 8 प्रमाणे 5 वर्ष सक्षम कारावास तसेच कलम 12 प्रमाणे 01 वर्ष शिक्षा देण्यात आली. अशी संपूर्ण
शिक्षा एकत्रीतरित्या भोगावायाची आहे. तसेच आरोपीताने मे. न्यायालयापुढे किंवा बंदीकारावास अधिका-या पुढे कैदी सुटी म्हणून सुटी मागण्याचे अधिकार राहणार नाही असा वेगळा आदेश केलेला आहे. आरोपी गुन्हा खटल्यापासून जिल्हा कारागृह, जळगांव येथेच बंद कैदी होता. सदर खटल्याचे कामी प्रथमच मे. न्यायालयात जलत गतीने खटला चालविला. या कामी पैरवी अधिकारी, सहा. फौजदार उदयसिंग सांळुके व पो.हे.कॉ. हिरालाल पाटील, तसेच पो..कॉ. सतिष भोई पो.स्टे अडावद, पो.कॉ. राहुल रणधीर पो.स्थे.ग्रॉमीण, पो. कॉ. नितीन कापडण पो.स्टे शहर यांनी काम पाहीले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

News Blogger Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable