राजकीय कादंबरी लिहिण्यासाठी आजचे वातावरण चांगले मुख्यमंत्री
जळगाव पोलीसराज मिडिया
महाराष्ट्राच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवताना डोळ्यांनाही ताण पडला त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. म्हणून उपस्थिती देऊ शकलो नाही. अशी खंत व्यक्त करत त्यांनी साहित्यिक व कादंबरीकार यांना राजकीय कादंबरी लिहिण्यासाठी आज सारखे पोषक वातावरण व संधी त्यांना कधी उपलब्ध होणार नाही असे सूचक वक्तव्य करत त्यांना राजकारणावर लिहिण्याचे सांगितले राज्याचे मुख्यमंत्री यांनी 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऑनलाईन सहभागी होऊन समारोपत सहभाग नोंदवला
97 व्यां मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे ऑनलाईन सहभागी झाले होते. साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी आपण का उपस्थित राहू शकलो नाही याचा राजकीय भाषेत उल्लेख करीत राज्याच्या विकासावर बारीक लक्ष असल्याने डोळ्यांवर ताण पडला व त्यामुळे ऑपरेशन करावे लागले म्हणून उपस्थित राहू शकलो नाही अशी कोपरखडी करत त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली व त्यांनी साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री यांनी उपस्थिती द्यावी ही प्रथा व संस्कृती आहे मात्र नाईलाज असल्याने आपण खानदेशातील या मराठी साहित्य संमेलनाला अनुपस्थित राहिलो खानदेशातील साने गुरुजी कवियत्री बहिणाबाई या महान विभूतींचा स्पर्श झालेला आहे व त्या ठिकाणी मराठी भाषेचा कुंभमेळा भरला होता.
अमळनेर येथे 97 साहित्य संमेलन पार पडत असताना शंभरावे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर भव्य दिव्य आयोजित केले जाईल महाराष्ट्र शासन शंभराव्या साहित्य संमेलनाला परिपूर्ण सहाय्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली व यावेळी आपले सरकार राहील असेही त्यांनी सूचक वक्तव्य केले.
खानदेश भूमी मधील विशेषतः जळगाव व अंमळनेर या ठिकाणी वाल्मीक रुषी महर्षी व्यास संत सखाराम महाराज व अनेक संतांनी स्पर्श झालेली भूमी आहे यातच वाल्मिक ऋषी यांचे नाव अयोध्येचे विमानतळाला देऊन खानदेश व आयोध्या यांची एक नाद जोडली गेल्याचे उल्लेख मुख्यमंत्र्यांनी समारोप बोलताना केला. देशाच्या भूमीत अनेक संतांची परंपरा आहे व संतांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केलेले आहेत असे उल्लेख त्यांनी केला
साने गुरुजी यांचे विचारांची परंपरा असून त्यांचा पदी स्पर्श या भूमीला लाभलेला आहे त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून संस्कृत पाया हरवलेला आहे मराठी साहित्याची सर्व समाजाला जाग आणणारी आहे. आपण आपल्या साहित्यातून ती ओळख करून देत असतो असे प्रेरणा देणारे साहित्य संमेलन बड देण्याचे काम करीत असतात
प्रत्येक तालुक्या ठिकाणी ग्रंथाला विशेष अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले व तालुक्याच्या ठिकाणी साहित्य च्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन ही दिले जाईल व जिल्हा महामंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले व त्याचा प्रचार प्रसार होईल असेही ते म्हणाले
अमळनेरला असलेले शंभर वर्ष जुने तत्त्वज्ञान केंद्र आहे या केंद्राच्या प्रस्ताव पाठवल्यानंतर महाराष्ट्र सरकार त्याचा सकारात्मक विचार करेल असे शेवटी त्यांनी सांगितले व शेवटी त्यांनी साहित्यकरांना सांगितले की राजकीय कादंबरी लिहिण्याचे आजचे वातावरण सगळ्यात चांगले आहे व साहित्यिकांना ही संधी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

