Type Here to Get Search Results !

"बड़े बड़े देखें जो लोग , उनको व्यापे चिंता रोग" - संतश्री लोकेशानंदजी महाराज

मुख्य संपादक:- संदीप पाटील 0

 "बड़े बड़े देखें जो लोग , उनको व्यापे चिंता रोग" - संतश्री लोकेशानंदजी महाराज


पल्लवी प्रकाशकर
नंदुरबार जिल्हा
9-1-2024

शहादा येथील श्री श्री नारायणपुरम तीर्थ येथे आजपासून श्रीमद्भगवद्कथेला मोठ्या भक्तीमय वातावरणात  नारायण भक्ती पंथाचे संस्थापक आचार्य संतश्री लोकेशानंदजी महाराज यांच्या मुख्य उपस्थितीत सुरुवात झाली.
जीवनात मनुष्याला कधीही समाधान नसते.


मनुष्य नेहमीच अजुन -अजुन मिळवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत राहतात.कितीही पैसा कमावला तरी देखील मनुष्य असमाधानीच राहतो.आयुष्य पैशाच्या मागे पळत घालवतात.परंतु सुख समाधान मिळत नाही.
ऐश्वर्य संपन्न लोक आज उदास चिंताग्रस्त जीवन जगत आहेत.अशांती , निद्रानाश, नैराश्याच्या आधीन मनुष्य आज झालेला दिसतोय.समुपदेशन, झोपेच्या गोळ्या यावर आजचा व्यस्त मानव जीवन जगतोय .
श्री नारायण विष्णू भगवान नामस्मरणच सर्व रोग,चिंता हरण करणारे आहे.


श्रीमद् भागवत कथे मधे धुंधूकारी , गोकर्ण यांचा प्रसंग वर्णन करतांना श्रीमद् भागवत कथा श्रवण करण्यामात्र ने मुक्ती मिळते असे संतश्री लोकेशानंदजी महाराज यांनी सांगितले. संतश्री तुकाराम महाराजांच्या विविध प्रसंगाचे वर्णन ही आजच्या कथेत कथन करण्यात आले.
मनःशांती साठी श्री विष्णू भगवान नामस्मरण करावे.


आजच्या हायटेक युगात श्री नारायण भक्ती पंथ अपडेट आहे .अनुसाशीत आणि शिस्तप्रिय असे श्री विष्णू भक्त समाजात वावरताना आदर्श निर्माण करत आहेत.जास्तीत जास्त भक्तांनी श्री नारायण भक्ती पंथात येऊन श्री विष्णू सेवा करावी असे आवाहन संतश्री लोकेशानंदजी महाराज यांनी केले आहे.
51हुन अधिक जोडपे श्रीविष्णु स्वरूप पुजेसाठी कथेत बसले आहेत.नारायण भक्ती गीतांनी भक्त भावूक होऊन नाचू लागले.अतिशय उत्साहात पहिल्या दिवसाची कथा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्रवण केली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

News Blogger Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable