चार बोगस डॉक्टरांवर पोलिसी कारवाई साक्री तालुक्यातील चौघांसह उपचाराचे साहित्य घेतले ताब्यात
पोलीसराज मिडिया :- साक्री
कुठलाही वैद्यकीय परवाना नसताना देवरे नी रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या चार बोगस डॉक्टरांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून वैद्यकीय उपचाराचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.या संबंधित बोगस डॉक्टर साक्री तालुक्यात वार्सा आणि पिंपळनेर परिसरात रुग्णांवर उपचार करून त्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आल्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिलेल्या आदेशानुसार पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी एक विशेष पथक तयार करून बोगस डॉक्टरांवर कारवाई केली.पिंपळनेर आणि वार्सा दुरक्षेत्र अंतर्गत पेट्रोलिंग पथकामार्फत बोगस डॉक्टरांवर छापा टाकण्यात आला.यात संभाजी सोनवणे रा.उंबरे,राकेश प्रकाश पाटील रा.महिंदळे,ता.पारोळा,ह.मु. गोपाळ नगर,पिंपळनेर,योगेश चंद्रकांत पाटील रा.विरार कल्याण ह.मु.गोपाळ नगर पिंपळनेर आणि आसित अमूल्य रतन विसवास रा. मध्य प्रदेश ह.मु.वार्सा ता.साक्री या चारही बोगस डॉक्टरांवर कारवाई करत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.वैद्यकीय समिती पथकातील कुडाशी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज ठाकरे,साक्री तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.हितेंद्र रामसिंग गायकवाड,पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी डॉ.महेंद्र शामराव शिंपी,आरोग्य सहाय्यक डॉ. साहेबराव बोरसे यांनी बोगस डॉक्टरांकडील वैद्यकीय उपचाराचे साहित्य व औषधे ताब्यात घेतले.समितीने केलेल्या पडताळणीत चारही बोगस डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाले,त्यांच्यावर वैद्यकीय व्यवसाय अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी,पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे,असई बापू पिंपळे,हवालदार शामराव अहिरे,पोलीस नाईक विश्वास हजारे,भास्कर सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी सोमनाथ पाटील,रवींद्र सूर्यवंशी,संदीप मोहिते व गिरीश पाटील यांनी केली.

