तांदळवाडीत प्रभू रामचंद्रांच्या पालखीची उत्साहात मिरवणूक
गावात रामकृष्ण हरी मुकूंदा मुरारी चा जय घोष
तांदळवाडी ता.चोपडा...
संदिप पाटील
तांदळवाडीत प्रभू रामचंद्रांच्या पालखीची मिरवणूक आज दि.१४ जानेवारी रोजी उत्साहात पार पडली.
सविस्तर वृत्त असे की, तांदळवाडी ता.चोपडा येथील श्री दादाजी धुनीवाले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परीसरात विवीध ठीकाणी मिरवणूकीचे आरोजन करण्यात आले. बाल गोपालांनी व भजनी मंडळीने मीरवणूकीचे आयोजन केले होते.तांदळवाडी येथे अयोध्येतील राम मंदिर मंगल अक्षता प्रतिकात्मक कलशाचा पालखी सोहळा उत्साहात झाला. मंगल अक्षता कलशाचे पूजन आज सायंकाळी तांदळवाडी येथील गावात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे व मंगल कलशाचे पूजन व औक्षण भजनी मंडळ व महिलांनी केले. त्यानंतर मुख्य मार्गावरून पालखी मिरवणूक काढली.
जागोजागी महिलांनी कलशाचे पूजन केले. मंगल अक्षता कलश दर्शनासाठी गावात फीरविण्यात आला.
मंदिरावर भगवा झेंडा लावला होता. सुमधूर आवाजाचे पालखीच्या पुढे बँड पथकही होते. त्या मुळे वातावरण प्रसन्न व भक्तिमय झाले होते. मिरवणुकीत बालगोपालांनी प्रभू रामचंद्रांची व सिता मातेची वेशभूषा धारण केली होती.बालगोपालांनी बानरसेनेची वेषभुषा धारण केली होती.

0 टिप्पण्या