सिमी प्रकरणातील आरोपी निघाला शिक्षक,
भुसावळ मधून दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांची कारवाईजळगाव - पोलीसराज मिडिया
सिमी या दहशतवादी संघटनेच्या निघणाऱ्या मासिक इस्लामिक मुव्हमेंट मध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याबद्दल आरोपी हनीफ शेख मोहम्मद हनीफ याला भुसावळ येथील खडका रोड येथून दिल्ली स्पेशल सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याला ट्रान्झिट रिमांड घेऊन दिल्लीला पोलीस रवाना झाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जिल्हा 2001 मध्ये प्रतिबंधक करण्यात आलेले होते त्या सिमी संघटनेचे एक मासिक निघत होते इस्लामिक मुव्हमेंट या मासिका मध्ये प्रक्षोभक लिखाण करण्याचा आरोप आरोपी हनीफ शेख मोहम्मद हनीफ याच्यावर होता व त्याविरुद्ध दिल्ली येथे 22 वर्षांपूर्वी न्यू फ्रंट कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यातील आरोपी आणि शेख सातत्याने गैरहजर राहिल्याने दिल्ली न्यायालयाने 2002 मध्ये फरार घोषित केले होते.
संशयित आरोपी हा भुसावळ येथे असल्याची माहिती दिल्ली दक्षिण विभाग साकेत मी अर्थ स्पेशल सेल ला मिळाली. बावीस वर्षापासून फरार असलेला आरोपी त्याला अटक करण्यासाठी स्पेशल सेलचे 15 अधिकारी व कर्मचारी दोन वाहनांद्वारे भुसावळ येथे दाखल झाले. गुरुवारी दुपारी बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपीला भुसावळ येथील खडका रोड दत्तनगर मेहराज बिल्डिंग या त्यांच्या राहत्या घरून अटक केली दिल्ली स्पेशल सेलचे निरीक्षक पवन कुमार , एस आय सुमित , नवदीप व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आरोपीला दिल्लीत नेण्यासाठी स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश व्हीं सी बर्डे यांच्या बेंच समोर आरोपीला नेण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मागितला. न्यायालयाने प्रकरणाची माहिती जाणून घेतल्यानंतर 48 तासाचा ट्रान्झिट रिमांड दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांना मंजूर केला.
प्रतिबंधक असलेल्या सिमी या संघटनेच्या मासिकात प्रक्षोभक लिखाण करणारा आरोपी व व गेल्या बावीस वर्षांपासून फरार असलेला आरोपी हनीफ शेख मोहम्मद हनीफ हा भुसावळ येथील खडका रोडवरील नगरपालिकेच्या 17 नंबर उर्दू हायस्कूल शाळेमध्ये गेल्या 13 तेरा वर्षापासून कायम शिक्षक आहेत . काही वर्षांपूर्वी अंमळनेर येथेही त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी करीत होते.
प्रतिबंधित असलेल्या सिमी संघटनेचा फरार आरोपी हा भुसावळ येथील शिक्षक निघाल्याने पुन्हा या प्रतिबंधित असलेल्या संघटनेचा व भुसावळ व त्यामानाने जळगाव जिल्ह्याचा पुन्हा एक वेळा संबंध दिसून आलेला आहे. यापूर्वीही जळगाव मधून सेमी प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलेले होते.

