चोपडा हातेड रस्त्यावर साडेचार लाख रुपयांच्या गुटख्यासह आरोपी अटकेत
चोपडा :-
मध्यप्रदेश मधून धुळ्याकडे जाणाऱ्या शिरपूर रोडवर एका पिकप मधून साडेचार लाख रुपयांच्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेला गुटखा मिळून आला याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी व गुटख्यासह बोलेरो पिकप असा एकुण ६ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
मध्यप्रदेश मधून किराणा सामानासह एका पिकअप वाहनातून धुळ्याकडे जाणाऱ्या शिरपूर रस्त्यावरून गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे 21 च्या मध्यरात्री मध्यप्रदेशातुन येणा-या कीराणा मालाच्या पिकअप वाहनातून शेंदवाकडुन धुळेकडे जाणाऱ्या चोपडा शिरपुर रोड वरील हातेड फाटा इथेच
सापळा लावला .पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप वाणाची तपासणी केली असता त्यामधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेला गुटखा १लाख ९४ हजार ४८० रुपय कीमतीचा विमल पान मसाला ३४हजार ३२० रुपय कीमतीचे सुगधीत तबाखु व ४लाख ५० हजार रु कीमतीची व बोलेरो पिकअप असा एकुण ६लाख ७८ हजार रुपये कीमतीचा माल घेऊन जाताना असताना आरोपी प्रशांत मानीको भिल रा. हेकंयवाडी ता. जि. धुळे याला चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीसानी गुटक्याची वाहतुक करणा-या आरोपीस मुददेमाल व वाहनासह अटक केली आहे.
ही कामगीरी . पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, कविता नेरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, स.पो.नी नितनवरे, हे.पो.कॉ शंशी पारधी, पो.कॉ मनीश गावीत, पो.कॉ. सदिप निळे, यांनी केली आहे.

0 टिप्पण्या