अल्पवयीन मुलीकडून दीड लाख खंडणी एक सोन्याची मोहनमाळ व दहा ग्राम सोन्याची अंगठी
जळगाव (पोलीसराज मिडिया)
जिल्ह्यातील पारोळा येथील एका अल्पवयीन मुलीला तिचे फोटो काढून ते अश्लील चित्रफितीत दाखवून तिला बदनाम करण्याची धमकी देऊन तिच्याकडून दीड लाख रोख एक सोन्याची मोहनमाळ व दहा ग्राम सोन्याची अंगठी घेतली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोग्य गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारोळा शहरातील सतरा वर्ष असलेल्या एक मुलगी सोबत गावातील एका युवकांनी प्रेम संबंध प्रस्थापित केले त्यानंतर अल्पवयीन मुलगी नाशिकला शिक्षणासाठी दिला असता तिथे भेटलेल्या जाऊन तिच्यासोबत फोटो काढले. गावी परत आली असता तुझे फोटो तुला दाखवून तुला लोकांना माझ्या समाजात बदनाम करेल अशी धमकी देऊन माझे कर्ज फिटेपर्यंत मला पैसे आणून दे. मुलीने पहिले वीस हजार त्यानंतर तीस हजार रुपये दिले. त्यानंतर आजीची तीस ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ व वडिलांचे दहा ग्रॅम वजन सोन्याची अंगठी घेतले व तिला शरीर सुखाची मागणी करून धमकी देऊन पुन्हा पैशाची मागणी केली वडिलांच्या एटीएम मधून दोन वेळेस 50- 50 हजार रुपये दिले. अल्पवयीन मुलीच्या वडिलांना एटीएम कार्ड व सोने घरात मिळून आल्याने घरात विचारपूस केली असता अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली तर मुलीने सर्व अधिकार सांगितली याप्रकरणी वडिलांनीदिलेल्या फिर्यादीवरून पारोळा. पोलीसात गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
0 टिप्पण्या