चाळीसगाव गोळीबार प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
जळगाव (पोलीसराज मिडिया) चाळीसगाव येथील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळा मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलेला आहे यात आरोपी कसे आले व कसे पसार झाले हे दिसत आहे. आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
चाळीसगाव येथील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या सिंधी कॉलनी येथील जनसंपर्क कार्यालयात सात रोजी बसलेले होते त्यावेळेस एक सफेद रंगाची कार घेऊन त्यांच्या कार्यालयात थांबली त्यामधून प्रथम तीन जण व नंतर दोन जण अशी पाच जण तोंडावर रुमाल बांधलेले बाहेर पडले. गावठी कट्टा घेवून त्यापैकी तीन जण पुढे आले त्यांनी दोन जणांनी माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर गोळ्या झाडल्या . त्यात ते गंभीर जखमी झाले. गोळीबार झाल्यानंतर पाचही जण कारमध्ये बसून नारायणवाडी पेट्रोल पंपाच्या दिशेने फरार झाले. हा घटनाक्रम नजीकच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
जखमी झालेले बाळू मोरे यांना तातडीने चाळीसगाव वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले. त्यांच्यावर फायरिंग का करण्यात आली याची माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी संजय बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनउद्देश उर्फ गुड्डू शिंदे, सॅम चव्हाण दोन्ही रा. हिरापूर, सचिन गायकवाड, अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख, भूपेश सोनवणे, सुमित भोसले चारही रा. चाळीसगाव आणि संतोष निकुंभ उर्फ संता पैलवान रा. हिरापूर,चाळीसगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली . त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूडे आदी पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहे.

0 टिप्पण्या